वृक्षारोपण सुरक्षेकरिता सिमेंट चुंगडीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST2021-02-05T07:34:00+5:302021-02-05T07:34:00+5:30
शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबोली दगडी पहाडी आहे. त्या ठिकाणी दहा फुटाच्या अंतरावर झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. झाडांच्या ...

वृक्षारोपण सुरक्षेकरिता सिमेंट चुंगडीचा वापर
शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबोली दगडी पहाडी आहे. त्या ठिकाणी दहा फुटाच्या अंतरावर झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. झाडांच्या वृक्षारोपणाची लागवड एका दिशेने करण्यात आली आहे. परंतु झाडाचे संगोपन व संरक्षण करण्याकरिता पहाडी भागात रस्त्याच्या कडेला झाडांच्या सभोवताल सिमेंट चुंगडीचा वापर करण्यात आलेला आहे. झाडांना ऊन व पावसापासून संरक्षणाकरिता झाडांची देखभाल व्हावी, यासाठी लावलेल्या कठड्याची दुर्दशा झालेली आहे. झाडांची वाढ झालेली नाही. सभोवताल लावलेल्या सिमेंट चुंगडीचा चुरा पडत आहे. वृक्षारोपण केलेल्या झाडांच्या सभोवताल बेशरमची झाडे वाढलेली दिसत आहे. निसर्गाच्या व पर्यावरणाच्या दृष्टीने समतोल राखण्याकरिता वृक्षारोपण केले जाते. वृक्षारोपण सभोवताली केलेल्या कुंपणाला बेशरमाची पालवी फुटलेली आहे. वृक्षारोपण केलेली झाडे जास्त प्रमाणात वाढलेली दिसत नाहीत. वृक्षारोपण केलेल्या झाडांची देखभाल करणे गरजेचे आहे.