अर्ज अद्ययावतीकरण ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 06:00 AM2019-10-24T06:00:00+5:302019-10-24T06:00:54+5:30

जिल्ह्यात यापूर्वी शिष्यवृत्तीचा महाघोटाळा झाला होता. या घोटाळ्यामुळे संपूर्ण राज्य हादरले होते. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची कार्यप्रणाली अंमलात आणण्यात आली. त्यानुसार सध्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र, हे अर्ज सादर करताना पूर्वी आधारकार्डसाठी वापरण्यात आलेले भ्रमणध्वनी हरविले अथवा कायमस्वरूपी बंद असल्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे.

Updating the application leads to headache | अर्ज अद्ययावतीकरण ठरतेय डोकेदुखी

अर्ज अद्ययावतीकरण ठरतेय डोकेदुखी

googlenewsNext
ठळक मुद्देशिष्यवृत्ती योजना : नेटसेवाही कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासकीय, निमशासकीय कामात आधार कार्ड महत्वाचे ठरविले जात आहे. दरम्यानच्या काळात शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करताना आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले. मात्र, या आधार कार्डसाठी वापरण्यात आलेला भ्रमणध्वनी नंबर जवळ नसल्यास शिष्यवृत्तीचे अर्ज भरणे कठिण झाले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची आधार कार्डसाठी यापूर्वी वापरण्यात आलेले भम्रणध्वनी नंबर बदलण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.
जिल्ह्यात यापूर्वी शिष्यवृत्तीचा महाघोटाळा झाला होता. या घोटाळ्यामुळे संपूर्ण राज्य हादरले होते. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची कार्यप्रणाली अंमलात आणण्यात आली. त्यानुसार सध्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र, हे अर्ज सादर करताना पूर्वी आधारकार्डसाठी वापरण्यात आलेले भ्रमणध्वनी हरविले अथवा कायमस्वरूपी बंद असल्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आधारकार्डसाठी वापरण्यात आलेले भ्रमणध्वनी (मोबाईल) नंबर बदलण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.
आधारकार्ड अद्यावत केल्यानंतरही आठ ते दहा दिवस नवीन आधारकार्ड अपडेट होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. तसेच मागील सत्राची अनेक विभागाची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. ती शिष्यवृत्ती दिवाळीपूर्वीच देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.

Web Title: Updating the application leads to headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.