बल्लारपूर पालिकेत अद्ययावत वाचनालय सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:38 IST2020-12-30T04:38:42+5:302020-12-30T04:38:42+5:30

याप्रसंगी माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, नगराध्यक्ष हरीश शर्मा, न.प. उपाध्यक्ष मीना चौधरी, काशी सिंग, मनीष पांडे, समीर केने, अजय ...

Updated library started in Ballarpur Municipality | बल्लारपूर पालिकेत अद्ययावत वाचनालय सुरू

बल्लारपूर पालिकेत अद्ययावत वाचनालय सुरू

याप्रसंगी माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, नगराध्यक्ष हरीश शर्मा, न.प. उपाध्यक्ष मीना चौधरी, काशी सिंग, मनीष पांडे, समीर केने, अजय दुबे, आशिष देवतळे उपस्थित होते. वाचनालयातून ज्ञानसमृद्धी होते. अभ्यासू विद्यार्थी घडतात. संस्कार क्षमता येते. यामुळे, वाचनालय स्थळ सुविधापूर्ण हवे. ही गरज बल्लारपूर नगरपालिकेने ओळखळी. त्याचा विद्यार्थी व नागरिकांनी ज्ञान वृद्धीसाठी लाभ होईल, असे मत आमदार मुनगंटीवार यांनी याप्रसंगी व्यक्त केले. याच इमारतीत स्व. सुषमा स्वराज ई-वाचनालय कक्षाचेही लोकार्पण करण्यात आले. नगर परिषदेने पोलीस ठाण्यासमोर इमारत व संत सार्वजनिक वाचनालय १९६८ ला सुरू केले. याचे लोकार्पण राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते झाले. ती इमारत जीर्ण झाल्यामुळे ही नवीन इमारत बांधण्यात आली आहे.

Web Title: Updated library started in Ballarpur Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.