सेवापुस्तके अद्ययावत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:20 IST2021-06-26T04:20:25+5:302021-06-26T04:20:25+5:30

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक तालुका शाखा भद्रावतीच्या शिष्टमंडळाने पंचायत समितीअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत शिक्षण ...

Update service books | सेवापुस्तके अद्ययावत करा

सेवापुस्तके अद्ययावत करा

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक तालुका शाखा भद्रावतीच्या शिष्टमंडळाने पंचायत समितीअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत शिक्षण विभागाला निवेदन दिले. यावेळी सेवापुस्तक अद्ययावत करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात यावे, मोफत पाठ्यपुस्तके शाळांपर्यंत पोहोचविण्यात यावीत, प्राथमिक शिक्षकांची विविध प्रकारची थकीत देयके तात्काळ काढावीत, वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव, शैक्षणिक परवानगी, हिंदी मराठी सुट प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविण्यात यावेत, मासिक वेतनातून होणाऱ्या विविध प्रकारच्या कपाती तात्काळ जमा करण्यात याव्यात, सादिल अनुदान जमा न झालेल्या शाळांचे अनुदान तात्काळ जमा करण्यात यावे, तसेच विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. समस्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकारी धनपाल फटींग यांनी दिले.

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी विजय भोयर व संबंधीत अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक अमोल देठे जिल्हा कार्यवाह, विनोद बाळेकरमकर तालुका अध्यक्ष, विलास खाडे कार्याध्यक्ष, विलास मेश्राम उपाध्यक्ष उपस्थित होते.

Web Title: Update service books