कढोली येथे राष्ट्रसंतांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

By Admin | Updated: March 8, 2016 00:47 IST2016-03-08T00:47:56+5:302016-03-08T00:47:56+5:30

री गुरुदेव ग्रामोन्नती युवक मंडळ, संत निरंकारी मंडळ आणि कढोली (बु.) येथील ग्रामस्थांच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याच्या..

The unveiling of the nation's fullest statue at Kadoli | कढोली येथे राष्ट्रसंतांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

कढोली येथे राष्ट्रसंतांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

वामनराव चटप : सर्व आघाड्यांवर राष्ट्र यशस्वी व्हावे, हे राष्ट्रसंतांचे स्वप्न
कढोली : श्री गुरुदेव ग्रामोन्नती युवक मंडळ, संत निरंकारी मंडळ आणि कढोली (बु.) येथील ग्रामस्थांच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत गाडगेबाबा जयंती पर्वाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे उद्घाटन आदर्श गाव राजगडचे शिल्पकार चंदू पाटील मारकवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी साहित्यिक माजी आमदार एकनाथ साळवे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, डॉ. सुरेश उपगंन्लावार, सरपंच रसिका पडवेकर उपस्थित होते. देवराव ठावरी, विलास उगे, मारोती साव, देवराव कोंडेकर, श्यामसुंदर पोडे, सतिश लोंढे, राहुल सराफ, भाऊराव झाडे, संजीव पोडे, प्रेमलाल पारधी, मोहन मेश्राम, रंगराव पवार, सुधाकर गेडेकर आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रसंताच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभानिमित्ताने श्री गुरुदेव कार्यकर्ता संमेलन, समाज प्रबोधनपर विनोदी एकपात्री कार्यक्रम, इंजिनिअर भाऊ थुटे यांचे सप्तखंजिरी वादन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर यांनी केले. याप्रसंगी बंडोपंत बोढेकर यांनीही मार्गदर्शन केले. चंदू पाटील मारकवार म्हणाले, राष्ट्रसंतांनी गावालाच तिर्थ समजले आहे. पण हे सारे तिर्थ आज घाणीने माखली गेली आहे. गावात जसे विद्यालय तसे घरोघरी शौचालय असावे. ग्रामाच्या उत्थानासाठी प्रत्येकांनी राष्ट्रसंतांच्या प्रचार कार्यात झोकून द्यावे लागेल.
माजी आमदार चटप म्हणाले, माणसे मोठी होतात. कर्मांनी, कुटुंबाचा, समाजाचा, राष्ट्राचा आधार माणूस आहे. चांगली माणसं घडली तर राष्ट्र चांगले होईल. एकंदरीत राष्ट्र सर्व आघाड्यावर यशस्वी व्हावे, याचे स्वप्न राष्ट्रसंतांनी पाहिले होते, त्या दृष्टीने सर्वांची कृती आवश्यक असल्याचे ते म्हणाले. माजी आमदार एकनाथ साळवे म्हणाले, राष्ट्रसंतांचे विचार हा नवा शक्ती स्त्रोत असून यातून विचारक्रांतीच्या ज्योती निर्माण व्हाव्यात, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेतर्फे डॉ. गिरीधर काळे (बीबी) यांना समर्पित जीवन पुरस्कार तर कवी संजय येरणे (नागभीड) यांना दिवं. राजेश्वर बोढेकर स्मृती साहित्य साधना पुरस्कार प्रदान करण्यात आला. संचालन अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: The unveiling of the nation's fullest statue at Kadoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.