लाडबोरी येथे बुद्ध मूर्तीचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2016 00:51 IST2016-01-18T00:51:35+5:302016-01-18T00:51:35+5:30
सिंदेवाही तालुक्यातील बौद्ध समाज लाडबोरीच्या वतीने बुद्ध मूर्तीचे अनावरण आणि बुद्ध विहार लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.

लाडबोरी येथे बुद्ध मूर्तीचे अनावरण
नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील बौद्ध समाज लाडबोरीच्या वतीने बुद्ध मूर्तीचे अनावरण आणि बुद्ध विहार लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.
या दोन दिवसीय कार्यक्रमात पहिल्या दिवशी धम्म ध्वजारोहण, तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचे (साडेसात फुट उंच) अनावरण व महामाया बुद्ध विहाराचे लोकार्पण बुद्धस्वरूप दाानकर्ते भन्ते डॉ. अनेक (थायलंड) यांच्या हस्ते व भिक्खुसंघ (थायलंड) यांच्या उपस्थितीत झाले. पहिल्या दिवशी झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भन्ते डॉ. अनेक थायलंड तर अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश माने मुंबई, प्रमुख पाहुणे म्हणून भन्ते सुनान, भन्ते सेन्ता, भन्ते अषीचाई, सन्नी सीरी (सर्व थायलंड), खासदार अशोक नेते, भैय्या खैरकार, सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी किशोर गजभिये, मारोतराव कांबळे (ब्रह्मपुरी), दिनेश पाटील (नागपूर), चित्तरंजन नागदेवते (नागपूर) व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी विमल नामदेव नागदेवते यांचा डॉ. अनेक यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक दाद नागदेवते, संचालन चंद्रप्रकाश चहांदे तर आभार माजी सरपंच प्रदीप नागदेवते यांनी मानले.
सायंकाळी भन्ते संघवंश मुलटेकडी (कुशीनगर उ.प्र.) यांच्याकडून धम्मदेसना कार्यक्रम झाला. रात्री प्रबोधनकार भगवानदादा गावंडे व त्यांच्या संचाकडून प्रबोधनात्मक कार्यक्र्रम झाला. (वार्ताहर)