रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर अनिरूद्ध वनकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:25 IST2019-03-26T22:25:04+5:302019-03-26T22:25:23+5:30

झाडीपट्टी नाट्यसृष्टीचे कलावंत, लेखक व पथनाट्यकार अनिरूद्ध वनकर यांची राज्य रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष अरूण नलावडे यांनी ही नियुक्ती केली.

Unrecognized OneCare on the Theater Production Testing Board | रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर अनिरूद्ध वनकर

रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर अनिरूद्ध वनकर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : झाडीपट्टी नाट्यसृष्टीचे कलावंत, लेखक व पथनाट्यकार अनिरूद्ध वनकर यांची राज्य रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष अरूण नलावडे यांनी ही नियुक्ती केली. अनिरूद्ध वनकर हे २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.
झाडीपट्टी लेखक व गीतकारांनी संहिता परिनिरीक्षणकरिता अनिरूद्ध वनकर यांचेशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. विदर्भातील उपेक्षीत कलावंत व नाट्य लेखकांना संधी देण्यासाठी या पदाचा उपयोग करू, अशी माहिती वनकर यांनी दिली आहे.

Web Title: Unrecognized OneCare on the Theater Production Testing Board