‘गुरुजीं’च्या सरपंचपदासाठी एकवटली महिला शक्ती

By Admin | Updated: November 6, 2016 00:55 IST2016-11-06T00:55:25+5:302016-11-06T00:55:25+5:30

राज्यघटनेने अनुसूचित जाती व जमातींना पंचायतराज व्यवस्थेत स्थानिक स्वराज्य संस्थेत सरपंच बनण्याचे अधिकार बहाल केले.

The united female power for the gurujin's patriarch | ‘गुरुजीं’च्या सरपंचपदासाठी एकवटली महिला शक्ती

‘गुरुजीं’च्या सरपंचपदासाठी एकवटली महिला शक्ती

पत्रकार परिषद : शिवसेनेसह गावकरी धडकले तहसील कार्यालयावर
चिमूर : राज्यघटनेने अनुसूचित जाती व जमातींना पंचायतराज व्यवस्थेत स्थानिक स्वराज्य संस्थेत सरपंच बनण्याचे अधिकार बहाल केले. याच अधिकारातून आॅगस्ट-२०१५मध्ये ग्रामपंचायत नवतळाच्या सरपंचपदी निवड झालेले सरपंच नथ्थू अमृत मडावी यांच्यावर सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप करून विरोधकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीवरून सरपंच मडवी यांना पदमुक्त करण्यात आले. त्यामुळे नवतळा येथील नागरिक, महिलांनी या आदेशाविरूद्ध संताप व्यक्त करीत गुरूजींना सरपंचपद पुन्हा बहाल करण्यासाठी महिलाशक्ती एकवटली आहे.
चिमूर तालुक्यातील शंकरपूर परिसरात वसलेल्या नवतळा ग्रामपंचायतमध्ये नऊ सदस्य असून या ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक आॅगस्ट २०१५ मध्ये घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये सरपंचपद अनुसूचित जमातीकरिता राखीव असल्याने जनपथच्या काळात गुरुजी असलेले ८७ वर्षीय नथ्थू अमृत मडावी सरपंचपदी विराजमान झाले. गुरूजी व्यवसायातून सेवानिवृत्त झालेले नथ्थू मतडावी यांनी एक वर्ष जनहिताची कामे करीत जनसामान्यात व महिलांमध्ये चांगलीच ओळख निर्माण केली.
मात्र गावातील काही राजकीय गाव पुढाऱ्यांना मडावी यांचा वाढता जनाधार पचनी पडला नाही. त्यामुळे गावातील विरोधकांनी सरपंच मडावी व ग्रामपंचायत सदस्या निरीक्षणा कैलाश ढवळे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार केली. ज्या जागेवर अतिक्रमण असल्याचा अहवाल नवतळाचे तलाठी यांनी दिला त्या जागेवर सरपंच मडावी व निरीक्षणा ढवळे यांच्या पतीचे अतिक्रमण नसून ती जागा माणिक प्रल्हाद पेंदाम यांना व मृतक बळीराम भिक्य ढवळे यांना शासनाकडून मिळाली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पदमुक्त सरपंच नथ्थू मडावी व ग्रा.पं. सदस्या निरीक्षणा ढवळे यांनी दिली.
तलाठी प्रदीप गुंजेवार यांनी ज्या जागेवर अतिक्रमण केल्याचा अहवाल शासनास दिला, तो अहवाल खोटा आहे. भूमापन क्रमांक ११ अंतर्गत जागा १९७६ मध्ये शासन धोरणानुसार शासकीय वाटपात माणिक पेंदाम व भूमापन क्रमांक १० अंतर्गत मृत बळीराम भिका ढवळे यांना मिळाली. मात्र या जागेवर इतर दोघांनी अपील केल्याने ८५/२००९ नुसार सदर प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. मात्र तलाठ्यांनी याच जागेवर अतिक्रमण असल्याचा अहवाल शासनास दिला व याच अहवालावरून नवतळ्याचे पदमुक्त सरपंच नथ्थू मडावी व ग्रा.पं. सदस्या निरीक्षणा ढवळे यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे.
अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरूद्ध नवतळा येथील नागरिक व महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पदमुक्त सरपंच मडावी यांच्यावर शासनाने अन्याय केला आहे. आमच्या गावाला गुरुजीच सरपंच पाहिजे. ते एकदम स्वच्छ व चांगले आहेत. गुरुजींना न्याय मिळवून देण्याकरिता आम्ही तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी आल्याचेही महिलांनी सागितले.
पदमुक्त सरपंच मडावी व ग्रा.पं. सदस्या निरीक्षणा ढवळे यांना खोट्या अहवालावरून पदमुक्त करण्यात आले आहे. शासनास खोटा अहवाल देणारे तलाठी प्रदीप गुंजेवार यांच्या अहवालाची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी करीत गावातील पोलीस पाटील जंगीटवार यानीच शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे. तथा ज्या व्यक्तीने तक्रार केली तेच व्यक्ती तलाठ्याच्या अहवालावरील पंच आहेत. तेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी तलाठ्यावर कारवाई करावी व पदमुक्त सरपंच नथ्थु मडावी यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याची माहिती मधुकर शिवरकर, नामदेव ढवरे, रजनी कुमरे, लक्ष्मीकांत सुरणकर, अमोल दिघोरे यांनी सांगीतले. पत्रकार परिषदेला शिवसेना तालुका प्रमुख धरमसिंह वर्मा, उपतालुका प्रमुख स्नेहदिप खोब्रागडे, कैलाशसिंग जुनी, प्रमोद पारखी, दिनेश घुगुसकर व अमरदीप गेडाम आदींनी दिली. तसेच शिवसेना तीव्र आंदोलन करणार असल्याचेही सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

आम्हाला गुरुजीच सरपंच पाहिजे.. जी
अनेकांनी ग्रामपंचायतमध्ये सरपंचपद १० ते १५ वर्षे उपभोगले. मात्र गावासाठी व गरिबांसाठी काहीच केले नाही. तर स्वत:साठीच केले. मात्र गुरुजी सरपंच झाल्यापासून गावाचा विकास व गरिबाले न्याय मिळत आहे. गुरुजी कुणाचा चायबी पित नाहीजी म्हणून गुरुजीला न्याय देण्यासाठी आम्ही आपली मजुरी सोडून आलो जी. आणि गुरुजीसाठी तुम्ही सांगा कोणत्या आॅफिसात जायच तर आम्ही जावू. अशी आपुलकीची भावना वच्छला शिवरकर, वंदना कुमरे, सिंधु देव्हारे, कमल मडावी, पंचफुला दिघोरे, अजरा कुमरे, रूपा मडावी, किरण मेश्राम, रत्नमाला दिघोरे आदींनी व्यक्त केली.

Web Title: The united female power for the gurujin's patriarch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.