केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांनी घेतली मुनगंटीवारांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2016 01:08 IST2016-07-24T01:08:19+5:302016-07-24T01:08:19+5:30

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी शनिवारी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची त्यांच्या मुंबई येथील ....

The Union Minister of Defense, the Minister of State for Minority Affairs visited the meeting | केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांनी घेतली मुनगंटीवारांची भेट

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांनी घेतली मुनगंटीवारांची भेट

चंद्रपूर : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी शनिवारी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची त्यांच्या मुंबई येथील देवगिरी निवासस्थानावर सदिच्छा भेट घेतली.
यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री भामरे व वित्तमंत्री मुनगंटीवार यांच्यात विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने मुंबईत परमवीरचक्र स्मारक उभारणे, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात राज्यातील दुसरी सैनिकी शाळा स्थापन करणे, डिफेन्सच्या जागेवर वृक्षारोपण करणे आदीसह चांदा आयुधनिर्माणी (डिफेन्स, भद्रावती) येथील विविध समस्यांबाबत भेटीदरम्यान विस्तृत चर्चा झाली. संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील आयुध निर्माणी येथे भेट देऊन तेथील समस्यांबाबत आढावा घेण्याचे आश्वासन या भेटीदरम्यान केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री भामरे यांनी वित्तमंत्री मुनगंटीवार यांना दिले. (प्रतिनिधी)

 

Web Title: The Union Minister of Defense, the Minister of State for Minority Affairs visited the meeting