शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात कामगारांसाठी २०० खाटांचे रुग्णालय उभारणार, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची घोषणा

By राजेश मडावी | Updated: June 24, 2023 18:16 IST

काँग्रेस ओबीसीविरोधी असल्याचा आरोप

चंद्रपूर : औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपुरात कामगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कामगारांच्या आरोग्यासाठी २०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय (ईएसआयसी) उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय पर्यावरण, वने, श्रम व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, काँग्रेस पक्ष ओबीसीविरोधी आहे. काँग्रेसने मंडल आयोग रिपोर्ट लागू केला नाही, असा आरोपही त्यांनी केला.

यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार डॉ. कल्पना सैनी, आमदार संजय उके, भाजपचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण देवराव भोंगळे उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या पूर्तीनिमित्त भाजपतर्फे ‘मोदी @ 9’ या महाजनसंपर्क अभियानांतर्गत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव दौऱ्यावर आहेत.

केंद्र सरकारच्या नऊ वर्षांतील विकासकामांची माहिती देताना ना. यादव म्हणाले, २०१४ नंतरच जनसामान्यांमध्ये आत्मनिर्भरतेचा भाव निर्माण झाला. काँग्रेस सरकारच्या काळात सुशासन नव्हते. सरकार विकासकामांसाठी निधी पाठवायचे. मात्र, तो निधी लोकांपर्यंत पोहोचत नव्हता. मोदी सरकार गरिबांच्या कल्याणासाठी काम करत आहे. प्रधानमंत्री घरकुल अंतर्गत साडेतीन कोटी घरे निर्माण केली. ११ कोटी ७२ लाख शौचालये बांधली. १२ कोटी पाणी पुरवठा जोडणी दिल्या. ८० कोटी जनतेला धान्य पुरवठा, जनऔषधी केंद्र, पाच लाख आरोग्य विमा, जनधन खात्यामुळे १०.३० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले, असा दावा केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी केला.

२०१४ नंतर २ हजार किलोमीटर जंगल वाढले

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बंगालमध्ये मुस्लिमांचा समावेश ओबीसी समाजात चुकीच्या पद्धतीने करत आहे. हंसराज अहिर यांनी ही बाब उघडकीस आणली. तेलंगणा व राजस्थानात हाच प्रकार सुरू आहे. मोदी सरकारच्या काळात १५ शहरांत मेट्रो, जल रस्ते निर्माण केले. ७४ शहरांत विमानतळ झाले. ७०० नवीन मेडिकल कॉलेज, ६३ हजार नवीन वैद्यकीय जागा, ७ आयआयएम, ३९९ नवीन विद्यापीठे निर्माण केली. जगात आज भारताची पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. २०१४ नंतर २ हजार किलोमीटर जंगल वाढले, असेही ना. यादव यांनी सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारणhospitalहॉस्पिटलOBCअन्य मागासवर्गीय जातीchandrapur-acचंद्रपूरBJPभाजपाcongressकाँग्रेस