सारगड जंगलात अनोळखी मृतदेह

By Admin | Updated: April 3, 2017 02:01 IST2017-04-03T02:01:50+5:302017-04-03T02:01:50+5:30

तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागभीड तालुक्यातील शेवटच्या टोकावरील सारगड येथील जंगलात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.

Unidentified bodies in Saragarad forest | सारगड जंगलात अनोळखी मृतदेह

सारगड जंगलात अनोळखी मृतदेह

तळोधी (बा) : तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागभीड तालुक्यातील शेवटच्या टोकावरील सारगड येथील जंगलात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. वनविभागाच्या सारगड जंगलातील कक्ष क्र. २१ येथे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलीस पाटलाने पोलिसांना दिली. तळोधी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी त्या मृतदेहाचा पंचनामा केला. या मृतदेहाचा समोरील भाग सुजलेला आढळला. अंगावर पांढरे धोतर व समोरचा दात पडलेला होता. त्याचे वय अंदाजे ६५ वर्षे होते. या अनोळखी व्यक्तीची ओळख पटलेली नाही. सारगडच्या जंगलात वनमजूर गस्तीवर गेला होता. त्यावेळी त्याला हा मृतदेह दिसला. त्याची माहिती त्याने सारगडच्या पोलीस पाटलाला दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय ठाकूर, पोलीस हवालदार बोढे, हंसराज सिडाम आदी करीत आहेत. (वार्ताहर)
 

Web Title: Unidentified bodies in Saragarad forest