बदलत्या परिस्थितीनुसार व्यवसाय निवडणे आवश्यक

By Admin | Updated: August 27, 2016 00:36 IST2016-08-27T00:36:06+5:302016-08-27T00:36:06+5:30

परिस्थिती बदलत आहे. बदलत्या काळानुसार जे बाजारपेठेत विकल्या जाऊ शकते, ते निर्माण करणे आवश्यक आहे.

Under the changing circumstances, the business needs to be selected | बदलत्या परिस्थितीनुसार व्यवसाय निवडणे आवश्यक

बदलत्या परिस्थितीनुसार व्यवसाय निवडणे आवश्यक

सुधीर मुनगंटीवार : कृषी व वन आधारित पर्यटन कार्यशाळा
चंद्रपूर : परिस्थिती बदलत आहे. बदलत्या काळानुसार जे बाजारपेठेत विकल्या जाऊ शकते, ते निर्माण करणे आवश्यक आहे. अलिकडे रोजगार, व्यवसायाचे प्राधान्यक्रम बदलले आहे. त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार कृषी, वनांवर आधारित पर्यटनासारखे व्यवसाय निवडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
येथील वनराजिक प्रबोधनीच्या सभागृहात वन व कृषी विभाग तसेच आत्माच्या संयुक्त विद्यमाने कृषी व वनावर आधारित पर्यटनाबाबत आयोजित कार्यशाळेच्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, सभापती देवराव भोंगळे, भाजपा जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा, कृषी पर्यटन संकल्पनेचे जनक पांडुरंग तावरे, वन प्रबोधनीचे संचालक अशोक खडसे, उपवनसंरक्षक गजेंद्र नरवने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.अण्णासाहेब हसनाबादे, प्रकल्प संचालक (आत्मा) विद्या मानकर, मार्गदर्शक अविनाश जोगदंड, रवी पाटील आदी उपस्थित होते.
जिल्ह्याचे जंगल ही शक्ती आहे, या शक्तीचा उपयोग करुन रोजगार व्यवसाय कसे निर्माण होऊ शकतात. याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. जिल्हयाच्या विकासासाठी ज्या ज्या योजना आणता येते, त्यासाठी प्रयत्न सुरु आहे. कृषी व वन आधारित पर्यटनाला जिल्हयात संधी असल्याने बदलत्या परिस्थितीनुसार रोजगाराचे हे क्षेत्र आत्मसात करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
जिल्हयाच्या विकासासाठी अनेक उपक्रम सुरु केले जात आहे. ६०० कोटी रुपये खर्च करुन अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय, २०० कोटी रुपये खर्चाची देशातील २६ वी सैनिकी शाळा, वन अकादमी, वनऔषधी रिसर्च सेंटर, चिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण केंद्र आपण करतो आहे. मानव विकासाच्या माध्यमातून रोजगारात पुढे जाण्यासाठी विविध क्लस्टर करत असल्याचेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. जिल्हयात २७ गावे आदर्श गावे म्हणून विकसित करणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी कृषी पर्यटन संकल्पनेचे जनक पांडुरंग तावरे यांनी कृषी, पर्यटन व त्यातील संधी यावर प्रकाश टाकला. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत वन विभाग, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक वनसंरक्षक रामराव कुळकर्णी यांनी केले. तर आभार वनपरिक्षेत्र अधिकारी हिवरे यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Under the changing circumstances, the business needs to be selected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.