शाळेबाबत अनिश्चितता शैक्षणिक साहित्य खरेदीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:00:36+5:30

मोठ्या प्रमाणात साहित्य असतानाही पाहिजे तसे ग्राहक फिरकत नसल्याने यावर्षी पुन्हा नुकसान होणार, अशी भीती व्यावसायिकांना आहे. त्यातच काही इंग्रजी शाळांनी शाळेतूनच पुस्तक खरेदी करणे पालकांना अनिवार्य केल्यामुळे त्याचाही परिणाम या व्यावसायिकांवर पडला आहे.

Uncertainty about school Breaks the purchase of educational materials | शाळेबाबत अनिश्चितता शैक्षणिक साहित्य खरेदीला ब्रेक

शाळेबाबत अनिश्चितता शैक्षणिक साहित्य खरेदीला ब्रेक

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : व्यवहार अद्यापही सुरळीत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शाळा सुरु करण्यासंदर्भात अद्यापही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांमध्ये संभ्रम आहे. याचा परिणाम शैक्षणिक साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना बसत आहे. मोठ्या प्रमाणात साहित्य असतानाही पाहिजे तसे ग्राहक फिरकत नसल्याने यावर्षी पुन्हा नुकसान होणार, अशी भीती व्यावसायिकांना आहे. त्यातच काही इंग्रजी शाळांनी शाळेतूनच पुस्तक खरेदी करणे पालकांना अनिवार्य केल्यामुळे त्याचाही परिणाम या व्यावसायिकांवर पडला आहे.
यावर्षी कोरोनामुळे शाळा, महाविद्यालयांना मार्च महिन्यापासूनच सुटी देण्यात आली. त्यातच आता शाळा सुरु करण्यासाठी शासन, प्रशासन तसेच पालकांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहे. त्यामुळे शासनाने तारखा जाहीर केल्या असल्या तरी शाळा सुरु होईल की, नाही याबाबत अद्यापही संभ्रम आहे. शाळा सुरु व्हायची असल्याने पालकही शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी अनुत्साही आहे. दरम्यान, बाजारामध्ये केजी पासून इतर वर्गांचे पुस्तक उपलब्ध आहे. त्यामुळे काही पालकांनी पुस्तकांची खरेदी केली आहे. सध्या काही ठिकाणी वह्या, नोटबुक, वॉटर बॅग, शालेय गणवेश खरेदी करण्यात येत आहे. परंतु मागील वर्षीच्या तुलनेमध्ये याचे प्रमाण अत्यल्प आहे.
दरवर्षी जूनमहिन्यामध्येच लाखो रुपयांची शैक्षणिक साहित्याच्या विक्रीतून उलाढाल होते. मात्र यावर्षी अद्यापही बाजारामध्ये पाहिजे तसा उत्साह नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. प्रथम लॉकडाऊनमुळे तीन महिने दुकान बंद होते. त्यातच अजूनही बाजारात पाहिजे तसा उत्साह नाही. त्यातच शाळा सुरु करण्यासंदर्भात अद्यापही अश्चितता असल्याने व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.

मागील काही वर्षांमध्ये काही इंग्रजी शाळा शाळेतूनच पुस्तक, बुक विद्यार्थ्यांना देत आहेत.. त्यामुळे या व्यवसायावर परिणाम पडला आहे. त्यातच शाळा, महाविद्यालये सुरु व्हायचे असल्यामुळे शैक्षणिक साहित्याची मागणी कमी आहे.
- निखिल तांबेकर
शालेय पुस्तक विक्रेता, चंद्रपूर

Web Title: Uncertainty about school Breaks the purchase of educational materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार