जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘ग्राम उदय से भारत उदय अभियान’
By Admin | Updated: April 15, 2016 01:27 IST2016-04-15T01:27:08+5:302016-04-15T01:27:08+5:30
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेकडर यांची १२५ वी जयंती असून या पार्श्वभूमीवर १४ ते २४ एप्रिल २०१६

जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘ग्राम उदय से भारत उदय अभियान’
स्तुत्य उपक्रम : अभियानाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची बैठक
चंद्रपूर : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेकडर यांची १२५ वी जयंती असून या पार्श्वभूमीवर १४ ते २४ एप्रिल २०१६ या कालावधीत ग्राम उदय से भारत उदय अभियान राबविण्याच्या सूचना नुकत्याच शासनाकडून प्राप्त झालेल्या आहेत. जिल्ह्यात अभियानाचा प्रसार व्हावा व अभियान जिल्ह्यातील गावात यशस्वी होण्यासाठी जिल्हा स्तरावर नुकतीच अभियानाच्या अनुषंगाने विभाग प्रमुख व गट विकास अधिकारी यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वी करा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या आहे.
सामाजिक सलोखा व अभिसरण वृद्धीगत करणे, पंचायत राज संस्थाचे बळकटीकरण करणे, शेतकऱ्यांचा विकास करणे, आणि गरीबांचे जीवनमान उंचावणे हे या अभियानाचे प्रमुख उद्देश असून अभियान कालावधी या उद्दीष्टानुसार गाव स्तरावर विविध उपक्रम राबवून योजनांची प्रचार प्रसिद्धीकरुन ग्रामीण भागात योजनाविषयी जाणीवजागृती करण्यात येणार आहे. सामाजिक एकोपा वृद्धीगत करण्याच्या अनुषंगाने समरसता व सद्भावना शपथ व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल व राष्ट्रीय एकात्मतेसाठी योगदानाबाबत ग्रामस्थामध्ये चर्चा घडवून, या विषयाच्या माहितीचे साहित्य गावस्तरावर ग्रामस्थांना वाटप करण्यात येईल.