बल्लारपुरात एकाच दिवशी दोन युवकांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:27 IST2021-03-19T04:27:17+5:302021-03-19T04:27:17+5:30
बल्लारपूर : बल्लारपुरात बुधवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. पहिल्या घटनेत बालाजी ...

बल्लारपुरात एकाच दिवशी दोन युवकांची आत्महत्या
बल्लारपूर : बल्लारपुरात बुधवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. पहिल्या घटनेत बालाजी वॉर्ड येथील रहिवासी राजू नरसय्या येंगन्दुलावार (२८) याने घराच्या बाथरूममध्ये हार्पिक पिऊन आत्महत्या केली. मृत हा माजी नगरसेवक स्व. नरसय्या येंगन्दुलावार यांचा मुलगा होता.
तर दुसरी घटना ही रवींद्र वाॅर्डात घडली. आपल्या आईला घराच्या वरच्या खोलीत झोपायला चाललो, असे सांगून वरचा खोलीत झोपायला गेलेल्या शुभम राजू बहुरिया (२६) याने घराच्या वरच्या खोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता समोर आली. बल्लारपूर पोलीस दोन्ही घटनांचा तपास करीत आहेत.