एटीएममधील रकमेच्या चोरी प्रकरणी दोन महिला अटकेत
By Admin | Updated: March 14, 2015 01:04 IST2015-03-14T01:04:38+5:302015-03-14T01:04:38+5:30
येथील पोलीस ठाण्यामधील महिला समुपदेशक केंद्रात कार्यरत महिला सहाय्यीका यांच्या बॅगमधील तीन एटीएम कार्ड लंपास करून त्याद्वारे विविध एटीएम केंद्रातून...

एटीएममधील रकमेच्या चोरी प्रकरणी दोन महिला अटकेत
भद्रावती : येथील पोलीस ठाण्यामधील महिला समुपदेशक केंद्रात कार्यरत महिला सहाय्यीका यांच्या बॅगमधील तीन एटीएम कार्ड लंपास करून त्याद्वारे विविध एटीएम केंद्रातून ६९ हजार २०० रुपये काढण्यात आले. या प्रकरणातील तीन आरोपीना पकडण्यात पोलिसांना यश आले असून मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत. ही घटना बुधवारी घडली.
आकाश दिनेश मिश्रा (१७) रा. वरोरा, उमेश ऊर्फ हनुमान सिमनानी (३०) रा. अमरावती व पूजा ऊर्फ बिट्टी दिनेश मिश्रा (२०) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. एटीएम कार्डची चोरी पोलीस ठाण्यामधील महिला समुपदेशक केंद्रातून झाली. बुधवारला येथील आठवडी बाजार असते. आठवडी बाजाराच्या दिवशी अनेक सराईत गुन्हेगार याठिकाणी हजेरी लावतात. समुपदेशक केंद्रातील महिला सहाय्यीका दीपकांता लभाने या बॅग तिथेच ठेवून काही कारणास्तव बाहेर गेल्या. हिच संधी साधून आरोपी आकाश दिनेश मिश्रा याने बॅगेतील तीन एटीएम कार्ड चोरले. यावेळी त्याचे सहकारी उमेश सिमनानी, पूजा मिश्रा हे सुद्धा उपस्थित होते. चोरी केल्यानंतर या सर्वांनी स्टेट बँक आॅफ इंडिया वरोरा येथून २५ हजार, सेंट्रल बँक वरोरा येथून १६ हजार ६१०, बँक आॅफ इंडिया भद्रावती ४ हजार ५०० व नागपूर येथील वेगवेगळ्या ठिकाणावरून असे एकूण ६९ हजार २०० रुपये काढलेत. यात सिडीको बँक चंद्रपूर, बँक आॅफ इंडिया वरोरा आणि स्टेट बँक आॅफ वरोरा या बँकांचे एटीएम होते. या एटीएमचे पासवर्ड त्यावरतीच लिहून होते. हे सर्व आरोपी येथे एका मित्राच्या कार्यक्रमासाठी आले होते. घटनेची दखल घेऊन ठाणेदार अशोक साखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक क्षिरसागर यांनी विविध एटीएम मधून त्याचे फुटेज काढले आरोपींना ताब्यात घेतले. यातील आरोपी हनुमान सिमनानी हा फरार आहे. आरोपीना न्यायालयाने १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (शहर प्रतिनिधी)