एसटी बसच्या चाकात आल्याने दुचाकीस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:32 IST2021-03-01T04:32:01+5:302021-03-01T04:32:01+5:30
रोहन ऊर्फ जाकी अशोक माटे (२२) रा. होल्टेज सागर कॉलनी वरोरा असे मृताचे नाव आहे. रोहन हा एमएच ३४ ...

एसटी बसच्या चाकात आल्याने दुचाकीस्वार जागीच ठार
रोहन ऊर्फ जाकी अशोक माटे (२२) रा. होल्टेज सागर कॉलनी वरोरा असे मृताचे नाव आहे.
रोहन हा एमएच ३४ एफ ३२७६ या क्रमांकाच्या दुचाकीने बोर्डा चौकात विरुद्ध दिशेने येत असताना रस्त्यात एमएच ३४ २५१८ या क्रमांकाच्या काळी-पिवळी चालकाने अचानक दरवाजा उघडला. त्यात दुचाकीस्वार धडकून खाली पडला. अशातच मागाहून एमएच ४० एक्यू ६४२० या क्रमांकाची नागपूर आगाराची एसटी बस नागपूरहून सिरोंचाकडे जात असताना रस्त्यावर पडलेला दुचाकीस्वार बसच्या मागील चाकात आला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वरोरा पोलिसांनी एसटी बस पोलीस स्टेशनमध्ये जमा केली तर अपघातास कारणीभूत ठरलेल्या काळी-पिवळी टॅक्सीचा वरोरा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.