डुकराच्या कळपाला दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:28 IST2021-07-29T04:28:59+5:302021-07-29T04:28:59+5:30
छायाचित्र सास्ती : सास्ती मार्गावरील धोपटाळा हनुमान मंदिराजवळील रस्त्यावरून दुचाकीने जाताना रस्ता ओलांडणाऱ्या डुकराच्या कळपाला धडक दिल्याने अंकित ...

डुकराच्या कळपाला दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू
छायाचित्र
सास्ती : सास्ती मार्गावरील धोपटाळा हनुमान मंदिराजवळील रस्त्यावरून दुचाकीने जाताना रस्ता ओलांडणाऱ्या डुकराच्या कळपाला धडक दिल्याने अंकित दिलीप नरड(२३) रा. सास्ती या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान घडली.
अंकित हा रात्री धोपटाला जवळील शेतात डुकरामुळे होणाऱ्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी जागल करण्यासाठी गेला होता. रात्री १२नंतर परत येताना एकाएकी डुकरांचा कळप रस्त्यावर आडवा आल्याने मोटरसायकल त्या कळपावर धडकली. यामध्ये अंकित खाली पडला. त्याला डोक्यावर गंभीर मार लागला. उपचारासाठी ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. बुधवारी दुपारी सास्ती येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुस्वभावी तरुणाच्या अकस्मात मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.
280721\1946-img-20210728-wa0030.jpg
डुक्कर घ
च्या धडकेत मृत पावलेला युवक अंकित नरड