दुचाकीची बैलबंडी धडक, एक ठार, चार गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:27 IST2021-02-13T04:27:02+5:302021-02-13T04:27:02+5:30

एका दुचाकीने जुबेर उर्फ गोलू नूर शेख (२२) रा. मालवीय वार्ड वरोरा व राम भटकर हे दोघे नागपूरहून वरोराकडे ...

Two-wheeler hit, one killed, four seriously injured | दुचाकीची बैलबंडी धडक, एक ठार, चार गंभीर

दुचाकीची बैलबंडी धडक, एक ठार, चार गंभीर

एका दुचाकीने जुबेर उर्फ गोलू नूर शेख (२२) रा. मालवीय वार्ड वरोरा व राम भटकर हे दोघे नागपूरहून वरोराकडे येत होते. या दुचाकीची बैलबंडीला मागून धडक बसली. त्यात जुबेर उर्फ गोलू नूर शेख याचा मृत्यू झाला. राम भटकर व बैलबंडीवरील करण लोहार (३४), बालाजी लोहार (१३) व शिवा भाई लोहार (१५) हे गंभीररित्या जखमी झाले. प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयातून चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

बॉक्स

बाळू धानोरकर यांच्या माता-पित्याची संवेदनशीलता

खासदार बाळू धानोरकर यांचे माता-पिता नागपूर येथील वैद्यकीय तपासणी आटोपून भद्रावतीकडे जात असताना त्यांना अपघात दिसला. त्यांनी तत्काळ वाहन थांबून गंभीर जखमी असलेल्या कुबेर उर्फ गोलू नूर शेख याला आपल्या वाहनात घेतले व उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर ते भद्रावतीकडे रवाना झाले.

Web Title: Two-wheeler hit, one killed, four seriously injured