दुचाकीच्या डिक्कीतून ३१ तोळे सोने उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:17 IST2018-11-14T22:17:19+5:302018-11-14T22:17:37+5:30
चंद्रपूरच्या तुकुम परिसरात एका घरासमोर ठेवलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून तब्बल ३१ तोळे सोने उडविल्याची खळबळजनक घटना बुधवारी उघडकीस आली. या सोन्याची अंदाजे किमत १० लाख रुपये असल्याचे समजते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस सुशिलकुमार यांनी स्वत: गटनेचा आढावा घेतला. या प्रकरणातील आरोपी अद्यापही गवसले नाही. तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

दुचाकीच्या डिक्कीतून ३१ तोळे सोने उडविले
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरच्या तुकुम परिसरात एका घरासमोर ठेवलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून तब्बल ३१ तोळे सोने उडविल्याची खळबळजनक घटना बुधवारी उघडकीस आली. या सोन्याची अंदाजे किमत १० लाख रुपये असल्याचे समजते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस सुशिलकुमार यांनी स्वत: गटनेचा आढावा घेतला. या प्रकरणातील आरोपी अद्यापही गवसले नाही. तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बंडू संभाजी नागरकर व त्यांचा मुलगा पंकज बंडू नागरकर हे मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घरी असलेले एक ३१ तोळे सोने स्टेट बँक आॅफ इंडियाच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी घरून दुचाकीने निघाले. सोने दुचाकीच्या डिक्कीत ठेवले होते. ते सरळ बँकेत न जाता तुकुम येथे पंकज नागरकर यांच्या सासुरवाडीला गेले. दुचाकी घरासमोर लावून बापलेक घरात गेल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात घराच्या बाहेरून काही लोकांचा चोरी झाल्याचा आवाज आला. हा आवाज ेऐकून बंडू नागरकर व पंकज नागरकर बाहेर येऊन बघते तर त्यांच्याच दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले ३१ तोळे सोने चोरट्यांनी लांबविल्याची बाब पुढे आली. यानंतर पंकज नागरकर यांनी दूर्गापूर पोलिसांत धाव घेऊन फिर्याद नोंदविली. अज्ञात आरोपींविरूद्ध पोलिसांनी ३७९ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.