तंटामुक्त समितीने लावले दोन प्रेमविवाह
By Admin | Updated: June 2, 2015 01:17 IST2015-06-02T01:17:41+5:302015-06-02T01:17:41+5:30
महात्मा गांधीे तंटामुक्त समिती वासेराच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालय परिसरात दोन प्रेमविवाह लावण्यात आले. वासेरा

तंटामुक्त समितीने लावले दोन प्रेमविवाह
वासेरा : महात्मा गांधीे तंटामुक्त समिती वासेराच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालय परिसरात दोन प्रेमविवाह लावण्यात आले. वासेरा येथीलच रहिवासी असलेल्या दोन्ही युवकांच्या या विवाह सोहळ्याला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वासेरा येथील अमर प्रभाकर आनंदे हा युवक गुजरात राज्यात एका कंपनीत काम करीत असताना ओडिसातीत सरिता आंदेश्वर प्रधान या युवतीसोबत त्याची मैत्री झाली. त्यानंतर मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. यादरम्यान दोघांनीही विवाह करण्याचे ठरविले. त्यानुसार दोघेही वासेरा येथे पोहचले. गावात आल्यावर वासेरा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सदानंद कावळे तथा पोलीस पाटील देवेंद्र तलांडे यांची भेट घेऊन या दोघांनी लग्न करून देण्याबाबत विनंती केली. त्यानुसार तंटामुक्त समितीने लग्नाची तारीखही निश्चित केली.
यासोबतच वासेरा येथीलच एक युवक राजेंद्र गुरुदास मेश्राम या युवकाचे दुर्गा कामडी या युवतीसोबत मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दुर्गा ही कोसंबी (ता. नागभीड) येथील रहिवासी असून दोघांचीही भेट एका विवाह प्रसंगात झाली होती. तेथे दोघात मैत्री होऊन त्याचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनीही विवाह करण्याचे ठरविले. मात्र या लग्नाला मुलीकडील कुटुंबाचा विरोध होता. असे असताना मुलीने थेट वासेरा येथे येऊन मुलाची भेट घेतली.
त्यानंंतर या दोघांच्याही विवाहाचा प्रस्ताव वासेरा येथील तंटामुक्त समितीकडे दाखल केला. दोन्ही प्रस्तावाचा विचार करुन महात्मा गांधी तंटामुक्त समितीने दोन्ही प्रेमीयुगुलांना कागदाची पुर्तता करण्यात सांगितले व वेगवेगळ्या दिवशी विवाहाची तारीेख ठरवण्यात आली.
त्यानंतर वासेरा ग्रामपंचायत कार्यालय परिसरात मंडप डेकोरेशन करुन विवाह थाटामाटात लावण्यात आला. दोन्ही जोडधंदा तंटामुक्त समितीच्यावतीने संसार उपयोगी साहित्य देण्यात आले.
या विवाहप्रसंगी वासेरा येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सदानंद कोवळे, देवेंद्र तलांडे , सुनील घाटे, श्यामराव आत्राम, संजय कापकर, भगवान धात्रक, रविंद्र पेंदाम, तेजराम आनंदे, सुनिता आळे, पुंडलिक डोंंगरवार, सत्यवान पेंदाम, गणेश लांजेवार, विजय रामटेके यांच्यासह तंटामुक्त समितीचे सदस्य तसेच गावातील नागरिक वामन बोरकर, विष्णू बोरकर, योगराज आनंदी, डॉ. हेमंत वढे, शंकर नागापुरे, शंकर लांजेवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (वार्ताहर)