दोन लाखांचे सागवान जप्त

By Admin | Updated: September 30, 2015 01:27 IST2015-09-30T01:27:25+5:302015-09-30T01:27:25+5:30

सिंदेवाहीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या महालक्ष्मी देवस्थानजवळ वनसमिती किन्हीच्या सदस्यांनी

Two lakh jewelers seized | दोन लाखांचे सागवान जप्त

दोन लाखांचे सागवान जप्त

सिंदेवाही : सिंदेवाहीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या महालक्ष्मी देवस्थानजवळ वनसमिती किन्हीच्या सदस्यांनी एफडीसीएमच्या मागे महालक्ष्मी मंदिराजवळ २९ नग सागवान जप्त केले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. जप्त करण्यात आलेले सागवान तीन बाय चार घनमीटर असून याची किमंत दोन लाखाच्या घरात आहे.
सागवान जप्त केल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह मालाची तपासणी करुन मौका पंचनामा केला व वनविभागाच्या आगारात सागवान ठेवण्यात आले.
याप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिक शोध घेतला असता एफडीसीएमच्या कक्ष क्र. १७३ चिटकी बिट येथे नऊ झाडे तोडलेले आढळले. एफडीसीएम अधिकारी कुंभलकर यांना बोलावून तुटलेल्या झाडांची पाहणी करण्यात आली व वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कामडी यांनी चौकशी केली.
जप्त करण्यात आलेला सागवान एफडीसीएमच्या क्षेत्रात कापण्यात आले आहे. कुणाच्या आदेशाने सागवान कापण्यात आले आणि कुणासाठी वाहतूक केली जात होती, आदी प्रश्नांची उत्तरे एफडीसीएम अधिकाऱ्यांकडे नाही. त्यामुळे या प्रकरणात मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय असून एफडीसीएमचे अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
ही कारवाई किन्ही वनसमितीचे अध्यक्ष अरविंद लोनबले, जनार्दन गावंडे, सरपंच शालू मेश्राम, श्वेता गुरनुले, वनविभागाने क्षेत्र अधिकारी वसंत कामडी, एफडीसीएमचे कुंभलकर, क्षेत्र सहाय्यक एम.एम. बोढे व वढे, गेडाम, हटवाद यांनी केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Two lakh jewelers seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.