चंद्रपुरात पुन्हा दोन कोविड केअर सेंटर सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:27 IST2021-04-18T04:27:26+5:302021-04-18T04:27:26+5:30
मनपाने शहरात सात कोविड चाचणी केंद्र सुरू केले. उपचारासाठी वन अकादमी येथील तीन इमारतीत ३०० खाटांची व्यवस्था करण्यात आली ...

चंद्रपुरात पुन्हा दोन कोविड केअर सेंटर सुरू होणार
मनपाने शहरात सात कोविड चाचणी केंद्र सुरू केले. उपचारासाठी वन अकादमी येथील तीन इमारतीत ३०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या येथे २१९ रुग्ण भरती आहेत. यात १२५ पुरुष रुग्ण तर ९४ महिला रुग्णांचा समावेश आहे. वर्षभरात एकूण ४,६६९ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले. यातील ३,९११ रुग्ण उपचाराअंती बरे झालेत. कोरोना प्रतिबंधासह उपचारासाठी सैनिकी शाळा येथे ३०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू केले. शनिवारी दुपारपर्यंत ९० खाटा उपलब्ध होत्या. केंद्रात वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांसह कर्मचारी तैनात आहेत.
दाेन जागांची निवड
दूध डेअरी परिसरातील समाजकल्याण विभागाचे आदिवासी मुलींचे वसतिगृह आणि मुलांचे वसतिगृह येथे अनुक्रमे १८० आणि १२० खाटांची व्यवस्था असलेले सेंटर प्रस्तावित आहेत. याशिवाय २५० खाटांच्या सुविधेसह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरु करण्यास पालिका सज्ज आहे. शहरात सात केंद्र सुरू आहेत. नागरिकांना आपली तपासणी इंदिरानगर, रामनगर, बालाजी वॉर्ड, बगड खिडकी, बाबूपेठ, भिवापूर,महानगर पालिकेच्या हेल्थ पोस्ट सेंटर आणि तुकूम येथील काईस्ट हॉस्पिटलमध्ये करता येईल.
३८ हजार ५९३ जणांनी घेतली लस
कोरोना लसीकरणाची सुरुवात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून करण्यात आली. त्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात एकूण १४ लसीकरण केंद्र सुरु केले होते. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत एकूण ३८ हजार ५९३ जणांनी पहिली आणि दुसरी लस घेतली आहे. यामध्ये कोविशिल्ड ३५ हजार १२० तर, कोव्हॅक्सिन ३ हजार ४७३ जणांना देण्यात आली.
येथे करता येईल काेविड चाचणी
चंद्रपूर केने शहरात सहा आरटीपीसीआर चाचणी केंद्र तर चार ॲंटीजन चाचणी केंद्राची सोय आहे. शहरात वन अकादमी मूल रोड, क्राईस्ट हॉस्पिटल तुकुम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अभ्यंकर प्राथमिक शाळा बालाजी वॉर्ड, भिवापूर वॉर्ड सरदार पटेल प्राथमिक शाळा, रामनगर येथे आरटीपीसीआर चाचणी केंद्र सुरू आहे. ॲंटीजन चाचणीची व्यवस्था शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. १ इंदिरा नगर, सरदार पटेल प्राथमिक शाळा रामनगर, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. ४ बगड खिडकी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. ५ बाबूपेठ येथे करण्यात आली.
आजचे पॉझिटिव्ह - ३८७
एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण- २,०४६
रुग्णालय भरती - ७५५
गृह विलगीकरण - १,२९१