लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: मूल तालुक्यातील चिखली कन्हाळगाव मार्गावर मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास एक ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन उलटला. या अपघातात दोघेजण ठार तर १५-१६ जण जखमी झाले आहेत.जखमींना चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. सावली येथील मारोती लक्ष्मण शेंडे यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने जेवणाच्या कार्यक्रमासाठी सिंदेवाही तालुक्यातील जामलाई ग्रामदैवताला जात असताना हा अपघात घडला. मृतांमध्ये चंदू रस्से (१६) व बोळल निकुरे (४०) रा. सावली यांचा समावेश आहे. सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.
चंद्रपूर जिल्ह्यात ट्रॅक्टर उलटून दोन ठार, १५ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 12:16 IST