अवैधरीत्या मुरूमाची तस्करी करणारे दोन हायवा ट्रक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:46 IST2019-06-14T00:45:49+5:302019-06-14T00:46:47+5:30
तालुक्यातील व्याहाड खु. ते केरोडा मार्गावर मुरूमाची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रकवर तहसीलदारांनी कारवाई करून जप्त केले आहे. ही कारवाई गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

अवैधरीत्या मुरूमाची तस्करी करणारे दोन हायवा ट्रक जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : तालुक्यातील व्याहाड खु. ते केरोडा मार्गावर मुरूमाची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रकवर तहसीलदारांनी कारवाई करून जप्त केले आहे. ही कारवाई गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
मागील अनेक दिवसांपासून या परिसरात मुरूमाची अवैधरीत्या वाहतूक सुरू आहे. ही माहिती महसूल विभागाला समजली. त्यानुसार सावलीचे नायब तहसीलदार प्रविण चोडे व तलाठी नौकरकर यांनी सापळा रचून पियुश इन्फ्राटेक औरंगाबाद या कंपनीच्या दोन हायवा ट्रकची चौकशी केली असता वाहतूक परवाना नसल्याचे आढळून आले. दोन्ही ट्रक जप्त करण्यात आले. एमएच ३४ बीजी ५०५९ व एमएच ३४ बीजी ५०६० असे ट्रकचे क्रमांक आहे. सदर कंनपीवर चार लाख ५४ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पुढील कार्यवाही महसूल विभाग करीत आहे.