घरफोड्यांच्या दोन टोळ्या जेरबंद

By Admin | Updated: October 21, 2015 00:52 IST2015-10-21T00:52:55+5:302015-10-21T00:52:55+5:30

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या दोन टोळ्यांना शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने अटक केली ...

Two groups of burglars seized | घरफोड्यांच्या दोन टोळ्या जेरबंद

घरफोड्यांच्या दोन टोळ्या जेरबंद

मुद्देमाल हस्तगत : शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाची कारवाई
चंद्रपूर : शहरात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या दोन टोळ्यांना शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने अटक केली असून या टोळ्यांच्या अटकेने घरफोडीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
एका टोळीत आठ तर एका टोळीत तिघांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ आॅक्टोबरच्या मध्यरात्री स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयाच्या बाजुला असलेल्या हसन ट्रेडर्समध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आला. अज्ञात चोरट्यांनी लोखंडी सळाखीने शटर वाकवून चोरीचा प्रयत्न केला. यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ४५७, ३८०, ५११, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान, मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी आतिश राजू फुलझेले (३०), अमर देवराव धांडे (१९) दोघेही रा.बालाजी वॉर्ड चंद्रपूर व कुणाल यशवंत गर्गेलवार (२९) रा.विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर या तिघांना अटक केली. या आरोपींनी चोरीची कबुली दिली असून मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. यातील कुणाल गर्गेलवार हा तडीपार असून तो शहरातून राहून गुन्हे करीत होता. त्याच्या अटकेनंतर त्याच्याविरुद्ध
१ आॅक्टोबरला दुसरी घटना घडली. स्थानिक बागला चौक परिसरात लक्ष्मीचंद ग्यानचंद कोठारी यांचा जुना कारखाना आहे. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास या कारखान्याची भींत फोडून वर्कशॉपमधून ५१ हजार २४५ रुपये किमतीचे लोखंडी व पितळेचे साहित्य लंपास केले. याप्रकरणी शहर पोलिसांनी भांदवि ४६१, ३८०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, पोलिसांनी कैलास रमेश वाघमारे, विजय राजू चुनारकर, महादेव चुनारकर, राजू कोलपेलवार, मनोज माधुरे, विनोद माधुरे, राजकुमार मेकलवार, ऋषी चुनारकर यांना मंगळवारी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनिल ताजने, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रहुफ शेख, जमादार नरेश शेरकी,शिपाई प्रकाश बलकी, किशोर तुमराम, स्वामी चालेकर, किशोर वैरागडे यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Two groups of burglars seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.