दोन दिवसांपासून बेपत्ता दाम्पत्य घरी परतले

By Admin | Updated: September 12, 2015 00:52 IST2015-09-12T00:51:38+5:302015-09-12T00:52:14+5:30

दोन दिवसांपूर्वी घरी कुणालाही न सांगता घरातून अचानक बेपत्ता झालेले दाम्पत्य शुक्रवारी सुखरूप आपल्या घरी परतले.

For two days, missing couples returned home | दोन दिवसांपासून बेपत्ता दाम्पत्य घरी परतले

दोन दिवसांपासून बेपत्ता दाम्पत्य घरी परतले


चंद्रपूर: दोन दिवसांपूर्वी घरी कुणालाही न सांगता घरातून अचानक बेपत्ता झालेले दाम्पत्य शुक्रवारी सुखरूप आपल्या घरी परतले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला. डॉ.अनुप हस्तक व राधा हस्तक असे या दाम्पत्याचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी डॉ.अनुक हस्तक व त्यांच्या पत्नी राधा अचानक घरी कुणालाही न सांगता निघून गेले होते. सर्वत्र शोध घेऊनही कुठेच पत्ता न लागल्याने यासंदर्भात त्यांच्या नातलगांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र शुक्रवारी सायंकाळी हे दाम्पत्य सुखरूप घरी परत आले. त्यामुळे त्यांच्या आप्तांसह पोलिसांचाही जीव भांड्यात पडला. (प्रतिनिधी)

Web Title: For two days, missing couples returned home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.