दोन दिवसात १० कोरोना रूग्ण ब्रह्मपुरी तीन दिवस बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:00 AM2020-07-01T05:00:00+5:302020-07-01T05:01:09+5:30

तालुक्यातील ग्रामीण भागात बाहेरून आलेले परंतु संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असलेले १२ पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र, शहरात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. संस्थात्मक विलगीकरणात एकच व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला होता. मात्र रविवार व सोमवारी तब्बल १० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. प्रशासनाने उपाययोजना म्हणून कोरोना बाधित व्यक्ती आढळून आलेला परिसर सील केला आहे.

In two days, 10 corona patients Brahmapuri will be closed for three days | दोन दिवसात १० कोरोना रूग्ण ब्रह्मपुरी तीन दिवस बंद राहणार

दोन दिवसात १० कोरोना रूग्ण ब्रह्मपुरी तीन दिवस बंद राहणार

Next
ठळक मुद्देप्रशासनाचा निर्णय : हॉस्पिटल, मेडिकल, शासकीय कार्यालय सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : २५ जूनपर्यंत कोरोनामुक्त असलेल्या ब्रह्मपुरी शहरात दोन दिवसात कोरोनाचे १० रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाचा संसर्ग होवू नये, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १ जुलैपासून तीन दिवसांसाठी शहर बंद ठेवण्यात येणार आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात बाहेरून आलेले परंतु संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असलेले १२ पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र, शहरात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. संस्थात्मक विलगीकरणात एकच व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला होता. मात्र रविवार व सोमवारी तब्बल १० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. प्रशासनाने उपाययोजना म्हणून कोरोना बाधित व्यक्ती आढळून आलेला परिसर सील केला आहे.

आरोग्य तपासणी
प्रशासनाने सोमवारी सायंकाळी रेणुका माता चौक, फाशी चौक, भवानी वार्ड, चांदगाव मार्ग सील केला केला आहे. १ ते ३ जुलैपर्यंत शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात आरोग्य तपासणी सुरू राहणार आहे. नागरिकांनी घराबाहेर निघू नये व कोरोनाची साखळी तोडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गांगलवाडी येथेही सहा बाधित आढळल्याने गाव सील करून नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी दिली.

Web Title: In two days, 10 corona patients Brahmapuri will be closed for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.