शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात मंत्रिपदाचे यावेळी दोन दावेदार? कोणाला मिळणार मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 13:54 IST

Chandrapur Assembly Vidhan Sabha Election 2024 Results : नागरिकांना आशा लवकरच होणार निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी तब्बल पाच क्षेत्रांमध्ये भाजपचे आमदार निवडून आले. राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश आमदार मुंबईला गेले आहेत. मात्र, आता मंत्रिपदावरून जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. जिल्ह्याला यावेळी दोन मंत्रिपदे मिळतील, अशी आशा नागरिकांना आहे. 

राज्यातील हेवीवेट नेते म्हणून ओळख असलेले आणि मागील सात वेळा विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेले जिल्ह्यातील एकमेव नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागील टर्ममध्ये वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्रिपद तसेच ते जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा होते. दरम्यान, २०१४ मध्ये ते वित्तमंत्री होते. त्यामुळे यावेळी त्यांच्याकडे राज्यातील वजनदार मंत्रिपद राहील, असा विश्वास राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे, विधानसभा सभागृहातील मागील अनेक वर्षांचा अनुभव बघता त्यांच्याकडे भाजपमधील वरिष्ठ नेते मोठी जबाबदारी देतील, अशीही चर्चा जिल्ह्यात ऐकायला मिळत आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रातून मागील तीन वेळा निवडून आलेले भाजपचे बंटी भांगडिया यांनाही यावेळी मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिमूरमध्ये भांगडिया यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. या क्षेत्राकडे पंतप्रधानांचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यामुळे भांगडिया यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र आहे. या सहापैकी पाच विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचे आमदार निवडून आले. या पाचजणांपैकी सुधीर मुनगंटीवार, बंटी भांगडिया, किशोर जोरगेवार हे तिघे यापूर्वीही आमदार होते, तर राजुरा विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेले देवराव भोंगळे आणि वरोरा क्षेत्रातून करण देवतळे हे दोघे पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024chandrapur-acचंद्रपूरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपा