दोन गाड्यांचे क्रमांक सारखे!
By Admin | Updated: October 11, 2015 02:19 IST2015-10-11T02:19:05+5:302015-10-11T02:19:05+5:30
ब्रह्मपुरीत टीव्हीएस कंपनीच्या दोन दुचाकीचा रंग सारखा, मॉडेल सारखा असून दोन्ही गाड्याचे क्रमांकही सारखे असल्याचे आढळून आले.

दोन गाड्यांचे क्रमांक सारखे!
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरीत टीव्हीएस कंपनीच्या दोन दुचाकीचा रंग सारखा, मॉडेल सारखा असून दोन्ही गाड्याचे क्रमांकही सारखे असल्याचे आढळून आले. यात क्रमांक लिहिणाऱ्याची चूक असावी की आरटीओ खात्याची, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहे.
जिल्ह्यात एकाच कंपनीच्या चार चाकी किंवा दुचाकी गाडीवर सारखेच क्रमांक असल्याचे कोणी पाहिले किंवा ऐकलेलेही नसेल पण ब्रह्मपुरीत तसा प्रकार योगायोगाने डॉ.खुणे यांच्या हॉस्पीटलसमोर पाहायला मिळाला. दोन्ही गाड्याचे मालक योगायोगाने एकाच ठिकाणी आले. एक गाडी तीन महिन्याअगोदर व एक गाडी नंतर घेतली आहे. अजय नार्लावार यांचे दोन्ही लक्ष गाडीकडे गेले असता दोन्ही गाडीचे क्रमांक सारखे असल्याचे दिसून आले. दोघांनाही एमएच ३४ ए.एस. ६२९६ हा एकच क्रमांक कसा काय मिळाला, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)