नाकाबंदी करुन अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:41 IST2020-12-16T04:41:48+5:302020-12-16T04:41:48+5:30

चंद्रपूर : पडोली पोलिसांनी चौकात नाकाबंदी करुन एका चारचाकी वाहनातून देशी व विदेशी सह दोन लाख ३५ हजार रुपयांचा ...

Two and a half lakh items confiscated through blockade | नाकाबंदी करुन अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

नाकाबंदी करुन अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर : पडोली पोलिसांनी चौकात नाकाबंदी करुन एका चारचाकी वाहनातून देशी व विदेशी सह दोन लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई आदर्श बंडू पाटील (२०) रा. जयभीम चौक बल्लारपूर यास अटक केली आहे.

चारचाकी वाहनातून दारुची वाहतूक होत असल्याची माहिती पडोली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी पडोली चौकात नाकाबंदी केली. यावेळी टीएस ०१ ईए ४०८९ क्रमांकाच्या कारला थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनातून तीन पेटी मॅकडॉल नं. ०१, दोन पेटी रॉयलस्टॅग विदेशी दारु, पाच पेटी देशी दारु व ‍चारचाकी वाहन असा एकूण दोन लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन एकाला अटक केली. ही कारवाई ठाणेदार मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Web Title: Two and a half lakh items confiscated through blockade