दीड लाखांच्या देशी दारूसह दोन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:29 IST2021-05-12T04:29:15+5:302021-05-12T04:29:15+5:30
घुग्घुस : घुग्घुस - चंद्रपूर रस्त्यावरील धानोरा फाट्याजवळील पथकर नाक्यावर सापळा रचून दारूसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या ...

दीड लाखांच्या देशी दारूसह दोन आरोपींना अटक
घुग्घुस : घुग्घुस - चंद्रपूर रस्त्यावरील धानोरा फाट्याजवळील पथकर नाक्यावर सापळा रचून दारूसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी घुग्घुस पोलिसांनी आरोपी प्रतीक उर्फ लाला सुरेश शिंदे व आशिष कैलास राऊत रा.चंद्रपूर यांना अटक केली. सकाळी साडेनऊच्या सुमारास आरोपी कारमध्ये ५०० नग ९० मिलीची देशी दारू वणी येथून घेऊन घुग्घुस मार्गे चंद्रपूरच्या दिशेने जात असल्याची माहिती घुग्घुस पोलिसांना मिळताच, धानोरा फाट्याजवळील पथकर नाक्यावर सापळा रचला होता. ही कारवाई पो.नि.राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात घुग्घुस गुन्हे शोध पथकाचे सहायक फौजदार गौरीशंकर आमटे, सचिन बोरकर, मनोज धकाते, रंजित भुरसे, महेंद्र वन्नकवार, प्रकाश करमे, नितीन मराठे, रवि वाभीटकर, सचिन डोहे यांनी केली.