निकालाच्या सुत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप; दहावी अकरावींच्या गुणांनी वाढवली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST2021-07-18T04:20:42+5:302021-07-18T04:20:42+5:30
------ कोरोना काळात परीक्षा घेणे अशक्य होते. त्यामुळे शासनाने व शिक्षण मंडळाने अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. ३०-३०-४० ...

निकालाच्या सुत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप; दहावी अकरावींच्या गुणांनी वाढवली चिंता
------
कोरोना काळात परीक्षा घेणे अशक्य होते. त्यामुळे शासनाने व शिक्षण मंडळाने अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. ३०-३०-४० या त्रिसूत्रीचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. मात्र यामुळे पुढील शिक्षणाच्या प्रवेशाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना दहावी व अकरावीमध्ये कमी गुण होते, त्यांना या त्रिसूत्रीचा फटका बसणार आहे.
-प्रा. विजय गायकवाड, सावली
-----
परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होऊ शकले नाही. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला यामुळे सर्वांचे सारखे मूल्यमापन होणार आहे. अकरावी रेस्ट इअर म्हणून विद्यार्थी दुर्लक्ष करीत असले तरी सर्व विद्यार्थ्यांची स्थिती सारखीच असल्याने विशेष असा फरक पडणार नाही.
प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, चंद्रपूर
-------
दहावीमध्ये चांगले गुण होते. अकरावीला गांभीर्याने घेतले नाही. परंतु, आता दहावीचे व अकरावीचे प्रत्येकी ३० टक्के गुण विचारात घेण्यात येणार असल्याने निकालाविषयी धाकधूक वाटत आहे.
- संजना गेडाम, विद्यार्थिनी
-----
यंदा परीक्षाच झाली नसल्याने नेमका निकाल कसा लागतो. याबाबत सांशकता होती. परंतु, आता दहावी, अकरावी व बारावीचा विचार करण्यात येणार असल्याने काळजी वाटत आहे.
-राकेश रायपुरे, विद्यार्थी