टायर फुटल्याने भाजीपाला नेणारा मेटॅडोर पलटला

By Admin | Updated: December 22, 2014 22:45 IST2014-12-22T22:45:21+5:302014-12-22T22:45:21+5:30

वडसावरून कढोलीकडे आठवडी बाजाराकरिता भाजीपाला घेऊन जाणाऱ्या मेटॅडोरचा समोरील टायर फुटून झालेल्या अपघातात वाहनातील ११ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवारी

Turning the tire to vegetable oil, Metadora turned around | टायर फुटल्याने भाजीपाला नेणारा मेटॅडोर पलटला

टायर फुटल्याने भाजीपाला नेणारा मेटॅडोर पलटला

कुरखेडा : वडसावरून कढोलीकडे आठवडी बाजाराकरिता भाजीपाला घेऊन जाणाऱ्या मेटॅडोरचा समोरील टायर फुटून झालेल्या अपघातात वाहनातील ११ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वडसा-कुरखेडा मार्गावरील कसारी फाट्याजवळ घडली.
रिजवान पठाण (२७), सादीक शेख (३०), बंडू कांबळे (३०), कमलेश ठवरे (४०), कलाम शेख (२५) साबीर शेख (४०), अफाद शेख (३०), पंचफुला नैताम (४५) सर्व रा. वडसा, गोपीनाथ सहारे (६५), जगन बारसागडे (४०) रा. तळेगाव, रिनल लाडे (१८) रा. चोप (कोरेगाव) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार वडसा येथून एमएच २९ टी-३५२१ या क्रमांकाचा मेटॉडोर भाजीपाल्यासह विक्रेत्यांना घेऊन कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील आठवडी बाजाराकरिता जात असताना कसारी फाट्याजवळ अचानक मेटॅडोरचा समोरील टायर फुटल्याने अपघात झाला. या अपघातात ११ जण जखमी झाले. जखमींना तत्काळ कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र रिजवान पठाण, कमलेश ठवरे, अफाद शेख यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातात मेटॅडोर वाहन पलटल्याने पूर्णत: क्षतिग्रस्त झाले. वाहनातील विक्रेत्यांचा भाजीपालाही अस्ताव्यस्त पडला. या घटनेसंदर्भात कुरखेडा पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Turning the tire to vegetable oil, Metadora turned around

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.