बंद मत्स्य बीज केंद्र सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 22:22 IST2018-04-14T22:21:49+5:302018-04-14T22:22:04+5:30

जिल्ह्यातील बंद स्थितीत असलेले मत्स्य बिज केंद्र त्वरित सुरू करावे, असे निर्देश राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

Turn off the fishery seed center | बंद मत्स्य बीज केंद्र सुरू करा

बंद मत्स्य बीज केंद्र सुरू करा

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : मच्छिमार संघटनांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील बंद स्थितीत असलेले मत्स्य बिज केंद्र त्वरित सुरू करावे, असे निर्देश राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. मत्स्य बिज तयार करणाऱ्या संस्थाची नावे व तलावांची माहिती एकत्रित करीत भोई समाजातील जास्तीत जास्त तरूणांना चांदा ते बांदा या योजनेंतर्गत समाविष्ट करावे व योजनेचा लाभ द्यावा, असेही निर्देश ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आयोजित जिल्ह्यातील मच्छिमार संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, आ. नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, पोंभुर्णाचे नगराध्यक्ष गजानन गोरंटीवार, माजी जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले, सहायक आयुक्त (मत्स्य व्यवसाय) सुनील जांभुळे, मत्स्यव्यवसाय अधिकारी प्रशांत वैद्य, सहायक मत्स्यव्यवसाय अधिकारी जितेंद्र केशवे, यांच्यासह मच्छिमार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले, मूल शहरात नवीन माकेंटचे बांधकाम होत आह.े त्याठिकाणी मत्स्य विक्री करता येऊ शकते. त्यादृष्टीने योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. खाद्य तयार करणाºया कंपन्यांची माहिती संकलित करावी, ज्यांना मत्स्य बिज पाहिजे त्यांना आर्थिक मदत करावी, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मत्स्?य योजनांना प्रोत्साहन द्यावे अश्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी मत्स्यव्यवसाय विभागातर्फे सादरीकरण करण्यात आले.
आतापर्यंत ७४४ लक्ष मत्स्यांची निर्मिती करण्यात आली. चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत यासाठी ६.९० कोटी रु. निधी मंजूर करण्यात आला आहे. ३० कोटी मत्स्यबिजे तयार करण्यात येऊ शकतात, मत्स्यखत निर्मिती यंत्र तयार करून एका तालुक्यास एक यंत्र देण्याचे नियोजन आहे, केंद्र शासन पुरस्कत निल क्रांती योजना यासाठी कार्यान्वित असल्याची माहिती यावेळी सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

Web Title: Turn off the fishery seed center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.