हळद लागण्यापूर्वीच नियतीने साधला डाव

By Admin | Updated: April 9, 2015 01:16 IST2015-04-09T01:16:53+5:302015-04-09T01:16:53+5:30

विवाहाचा दिवस ठरला, तयारी पूर्ण झाली. लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी चार ते पाच दिवस उरले होते. आनंदात घराची स्वच्छता सुरू होती.

Before the turmeric is over, the destiny is done | हळद लागण्यापूर्वीच नियतीने साधला डाव

हळद लागण्यापूर्वीच नियतीने साधला डाव

गडचांदूर : विवाहाचा दिवस ठरला, तयारी पूर्ण झाली. लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी चार ते पाच दिवस उरले होते. आनंदात घराची स्वच्छता सुरू होती. मात्र स्वच्छता करताना सापाने दंश केला आणि हळद लागण्यापूर्वी प्राणज्योत मावळली. ही घटना राजुरा तालुक्यातील खिर्डी येथे सोमवारी घडली.
गणेश वायकोस (२४) रा. खिर्डी असे मृताचे नाव आहे. १२ एप्रिलला गणेशचे लग्न ठरले होते. लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. घरात आनंदी वातावरण होते. घराची स्वच्छता करताना सोमवारी सायंकाळी ७ वाजता गणेशला सर्पदंश झाला. त्याला त्वरित गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथून चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास गणेशची प्राणज्योत मावळली.रामचंद्र वायकोस यांचा गणेश हा एकुलता एक मुलगा होता. या घटनेने संपूर्ण खिर्डी गाव शोकात बुडाले आहे. (वार्ताहर)

Web Title: Before the turmeric is over, the destiny is done