सोमय्या पाॅलिटेक्निकतर्फे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:38 IST2021-02-05T07:38:30+5:302021-02-05T07:38:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : येथील सोमय्या पाॅलिटेक्निकच्यावतीने हळदी-कुंकू कार्यक्रम आयाेजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ...

सोमय्या पाॅलिटेक्निकतर्फे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील सोमय्या पाॅलिटेक्निकच्यावतीने हळदी-कुंकू कार्यक्रम आयाेजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक पी. एस. आंबटकर, संस्थेचे उपाध्यक्ष पियुष आंबटकर, प्रीती आंबटकर, अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख, रजिस्ट्रार राजेश बिसेन उपस्थित होते.
यावेळी अंकिता आंबटकर म्हणाल्या, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होऊन वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात ते सक्षम ठरले पाहिजेत. ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमध्ये आकलनशक्तीही निर्माण व्हावी, हा प्रयत्न यापुढे असणार आहे. सर्वांचे सहकार्य, कर्तृत्व व धडाडीच्या भरवशावर सोमय्याला संस्था दर्जेदार शिक्षणाचे माहेरघर बनवेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सर्व महिला प्राध्यापिकांनी त्यांना भेटवस्तू देऊन तोंड गोड केले. प्रा. धनश्री कोटकर यांनी एक स्वागतोत्सुक ही कविता सादर केली. प्रा. बलमवार, प्रा. धनश्री, प्रा. सोनम, प्रा. माधवी, प्रा. स्नेहल, प्रा. तृप्ती, प्रा. प्रियंका, लायब्ररियन भारती हे या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे साक्षीदार ठरले. यावेळी विभागप्रमुख प्रा. बोबडे, प्रा. ठाकरे, प्रा. गौरव, प्रा. सुतराळे, प्रा. नगराळे, प्रा. पोहणकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. नौशाद यांनी केले.