शिवसेनेतर्फे हळदी- कुंकू व रांगोळी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:43 IST2021-02-05T07:43:31+5:302021-02-05T07:43:31+5:30
चंद्रपूर : शिवसेना महिला आघाडी रामनगरतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही मकरसंक्रांतीनिमित्त हळदी- कुंकू व रांगोळी स्पर्धा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ...

शिवसेनेतर्फे हळदी- कुंकू व रांगोळी स्पर्धा
चंद्रपूर : शिवसेना महिला आघाडी रामनगरतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही मकरसंक्रांतीनिमित्त हळदी- कुंकू व रांगोळी स्पर्धा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत अनेक महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना महिला आघाडीच्या मनस्वी संदीप गिऱ्हे, रंगकर्मी डॉ. जयश्री कापसे, प्रीती घाटे, डॉ. मनीषा घुराल, सुवर्णा गुहे, डॉ. समता मडावी, कल्पना शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना, डॉ. जयश्री कापसे म्हणाल्या, कोरोनाचा काळ हा महिलांसाठी अत्यंत कठीण परिस्थितीचा होता. यावेळी महिलांनी घरची परिस्थिती उत्तमपणे हाताळली. त्याबद्दल सर्व महिलाचे कौतुक केले. मनस्वी गिऱ्हे म्हणाल्या, महिलांनी अनेक संकटांचा सामना केला. मात्र, स्वतःसाठी कधी वेळ दिला नाही. मकरसंक्रांतीनिमित्त आपण एकत्र येऊन स्वतःच्या भावना एकमेकांसमोर मांडत आहोत. हीच खरी महिलाशक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.