खडसंगी येथे तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:36 IST2021-02-05T07:36:28+5:302021-02-05T07:36:28+5:30
यावेळी सामुदायिक ध्यान कार्यक्रम मोहन समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. माता अनुसया भजन मंडळ खडसंगी यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम ...

खडसंगी येथे तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव
यावेळी सामुदायिक ध्यान कार्यक्रम मोहन समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. माता अनुसया भजन मंडळ खडसंगी यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला. घटस्थापना संत ब्रह्मलीन श्रवणदास बाबा, आरमोरी व त्यांचा पूर्ण संच यांच्या हस्ते झाले.
सामुदायिक प्रार्थना गुरुदेव बाल मंडळ व धनराज बारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. तसेच हरिपाठ, भारुडाचा कार्यक्रम झाला. ग्रामसफाई, महिलांनी हळदी-कुंकू कार्यक्रम घेतला.
होम हवन, अनिर्वचनाम जप यज्ञ झाला. प्रवचन संत बाबा श्रवणदास यांच्या ब्रह्मवाणीतून तसेच भजन जागृतीचा कार्यक्रम झाला. भजनाच्या कार्यक्रमाला गावाबाहेरील झरी, बंदर, नवेगाव, बरडघाट, पंढरपौनी येथील भजन मंडळी उपस्थित होती.
गावातून प्रभातफेरी काढून सामाजिक जागृती भजन, भारूड गायन झाले.