दुसऱ्याची जमीन स्वत:च्या नावाने करून विकण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: December 14, 2015 01:18 IST2015-12-14T01:18:44+5:302015-12-14T01:18:44+5:30

खोटे दस्तावेज बनवून, त्याद्वारे दुसऱ्याची शेतजमीन विकण्याच्या तयारीत असलेल्या येथील राजेश सुकरू केसकर याचेविरूद्ध तसेच या व्यवहारात साक्षीदार असलेले दोघेजण,

Trying to sell the land of another by its own name | दुसऱ्याची जमीन स्वत:च्या नावाने करून विकण्याचा प्रयत्न

दुसऱ्याची जमीन स्वत:च्या नावाने करून विकण्याचा प्रयत्न

गुन्हा दाखल : एकाला अटक
बल्लारपूर : खोटे दस्तावेज बनवून, त्याद्वारे दुसऱ्याची शेतजमीन विकण्याच्या तयारीत असलेल्या येथील राजेश सुकरू केसकर याचेविरूद्ध तसेच या व्यवहारात साक्षीदार असलेले दोघेजण, अशा तिघांविरूद्ध बल्लारपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीचे नाव वासुदेव रामचंद्र खंडाळकर (५२) (रा. मुंगोली ता. वणी) असे आहे.
वासुदेव खंडाळकर यांच्या मालकीची मुंगोली येथे १.३८ हेक्टर आर शेतजमीन असून त्या जमिनीचे आणखी चार हिस्सेदार आहेत. राजेश केसकर याने ती जमीन आपल्या मालकीची असल्याचे खोटे दस्तावेज बनविले व ती जमीन बल्लारपूर येथील सत्यनारायण नामक इसमाला १८ लाख रुपयांत विकण्याचा सौदा केला व तसे इसारपत्र लिहून देऊन त्यापोटी एक लाख रुपये घेतले. ही बाब वासुदेव खंडाळकर यांना माहित झाल्यानंतर बल्लारपूर पोलिसाकडे धाव घेऊन तशी तक्रार केली.
यावरून केसकर व इतर दोघांविरूद्ध पोलिसांनी कलम ४२० भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यातील केसकर याला अटक करण्यात आली आहे. या व्यवहारातील साक्षीदार मातादिन प्रसाद आणि मनिष शंकर यांना ही जमीन माझ्या मालकीची असल्याचे माहित होते, असे खंडाळकर यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Trying to sell the land of another by its own name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.