जागतिक बाजारपेठ उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार
By Admin | Updated: March 5, 2017 00:43 IST2017-03-05T00:43:23+5:302017-03-05T00:43:23+5:30
महिलांना विविध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून, उत्पादन वाढ, योग्य बाजारपेठ निवड, उत्पादनाचे योग्य पॅकींग, ....

जागतिक बाजारपेठ उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार
ए एस आर नायक याचे प्रतिपादन : महिला बचत गटांना मिळणार लाभ
चंद्रपूर : महिलांना विविध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून, उत्पादन वाढ, योग्य बाजारपेठ निवड, उत्पादनाचे योग्य पॅकींग, ब्रँडीग, व विविध स्तरावर विक्रीचे व्यासपिठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्याद्वारे महिला बचत गटांना जागतिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर नायक यांनी केले.
स्थानिक चांदा क्लब ग्रांऊडवर आयोजित सरस महोत्सव स्वयंसिध्दा २०१७ ला नुकतीच गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए एस आर नायक व नागपुर येथिल विदर्भ ईडंस्ट्रिज असोसिएशनच्या प्रतिनिधींनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
नागपुर येथिल विदर्भ इडंस्ट्रिज असोसिएशनच्या प्रतिनिधी चमूकडृून सरस महोत्सव स्वयंसिध्दा २०१७ महिला बचत गटांच्या २५० स्टॉलला भेट देवून, महिलांशी चर्चा करुन व्यवसायाविषयीचे मत जाणून घेतले. याशिवाय व्यवसाय वाढीसाठी काय करता येईल याविषयीची माहिती जाणून घेतली. तसेच विदर्भ इडंस्ट्रिज असोसियशनचे जाईन्ड सेक्रेटरी गिरधारी मंत्री यांनी बचत गटातील महिलांना उत्पादनाचे मार्केटिंग कसे केले पाहिजे, उत्पादन क्षमता कशाप्रकारे वाढविली पाहिजे, याविषयी आपल्या सादरीकरणाद्वारे उपस्थित बचत गटांच्या महिलांना समजावून सांगितले. उत्पादनाची गुणवत्ता व उत्पादकत्ता कशी सुधारता येईल. यासाठी महिला बचत गटांना काही प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्यासाठी अशाप्रकारचे सर्व प्रशिक्षण विदर्भ इडंस्ट्रिज असोसियशन कडुन नागपुर येथे देण्याची यावेळी हमी दिली.
याशिवाय महिला बचत गटामधून काही निवडक महिलांची निवड करुन, त्यांना मार्के टिंगसाठी तयार करावे. गिरधारी मंत्री पुढे म्हणाले, महिला बचत गटातंर्गत तयार होणाऱ्या उत्पादनासाठी रेल्वेस्टशन, विमानतळ, बंदर, याठिकाणी महिला बचत गटांच्या महिलांना आपले उत्पादन विक्री करण्याकरिता व्यासपिठ मिळाल्यास बचत गटाचे तयार होणारे दर्जेदार उत्पादन विक्री करण्यास राज्य, देश पातळीपासुन जागतिक पातळीचे बाजार उपलब्ध करण्यास मदत होणार आहे.
यासाठी विदर्भ इडंस्ट्रिज असोसियशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या सहकायार्ने शासन दरबारी मांडण्यात येणार असल्याचे यावेळी विदर्भ ईडंस्ट्रिज असोसियशनचे जाईन्ड सेकर्टरी गिरधारी मंत्री यांनी सांगितले. भेटी दरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, विदर्भ ईडंस्ट्रिज असोसियशनच्या अंजली गुप्ता, विचित्रा चोपडा, रिता लांजेवार, इंदू श्रिरसागर, पुनम लाला, प्रकाश ईटनकर अंजु सोमाणी, गडचिरोली ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक जयंत बाबरे यावेळी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)