बांबू संशोधन केंद्रासाठी प्रयत्न करणार

By Admin | Updated: October 6, 2014 23:10 IST2014-10-06T23:10:15+5:302014-10-06T23:10:15+5:30

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत पावणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणारे अर्थसहाय्य अल्प असल्यामुळे त्यात वाढ करून अर्थसहाय्याची रक्कम पाच लाख रुपये करण्यास मी विधानसभेच्या माध्यमातून संघर्ष

Trying for the Bamboo Research Center | बांबू संशोधन केंद्रासाठी प्रयत्न करणार

बांबू संशोधन केंद्रासाठी प्रयत्न करणार

सुधीर मुनगंटीवार : चिचपल्ली, अजयपूर आणि नागाळा येथे जाहीर सभा
चंद्रपूर : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत पावणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणारे अर्थसहाय्य अल्प असल्यामुळे त्यात वाढ करून अर्थसहाय्याची रक्कम पाच लाख रुपये करण्यास मी विधानसभेच्या माध्यमातून संघर्ष करून शासनाला भाग पाडले. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसाला वनविभागाच्या सेवेत नोकरी देण्याची मागणी मी शासनदरबारी रेटली. वनमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना भ्रष्टाचारापासून फुरसत मिळत नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नासंदर्भात दिलेले आश्वासने त्यांनी पूर्ण केली नाही. चिचपल्ली येथे बांबु प्रशिक्षण व संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी १७ कोटी रु. चा प्रस्ताव वनविभागाकडे सादर करण्यात आला आहे. याबाबतसुद्धा वनमंत्र्यांनी विधानसभेत दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. चिचपल्ली येथे बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू, अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा-रिपाई (आ) - मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यानी नागरिकांना दिली.
चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथील जाहीरसभेत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. विकासकामांसह सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही जनतेची सेवा केली. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात नेत्रचिकित्सा शिबिरांच्या माध्यमातून सुमारे ४५ हजार नेत्ररुग्णांची तपासणी आम्ही करविली. यातील २५ हजार नेत्ररुग्णांना मोफत चश्मे वितरण आणि ५५०० नेत्र रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आम्ही करविल्या. मूल शहरात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या माध्यमातून आरोग्य महाशिबिराचे आयोजनही केले. यावेळी मंचावर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हरीश शर्मा, चंद्रपूर महानगर भाजपाचे सरचिटणीस रामपाल सिंह, वनिता कानडे, चंद्रपूर तालुका भाजपाचे सरचिटणीस गौतम निमगडे, वासुदेव गावंडे, दयानंद बंकुवाले आदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Trying for the Bamboo Research Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.