सत्य, सदाचार आणि भक्ती हे परमेश्वर उपासनेचे मार्ग
By Admin | Updated: December 4, 2015 01:30 IST2015-12-04T01:30:20+5:302015-12-04T01:30:20+5:30
मागील अठरा वर्षापासूनची परंपरा कायम ठेवत कार्तिकी एकादशीला प.पुज्य सद्गुरु नामदेव रोकडे महाराज यांच्या..

सत्य, सदाचार आणि भक्ती हे परमेश्वर उपासनेचे मार्ग
माणिक रोकडे महाराज : जैतापूर येथे समाजप्रबोधन व गुणवंतांचा सत्कार
सास्ती : मागील अठरा वर्षापासूनची परंपरा कायम ठेवत कार्तिकी एकादशीला प.पुज्य सद्गुरु नामदेव रोकडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य जैतापूर येथील श्री गुरुदेव दत्त संप्रदय मंडळाच्या वतीने दोन दिवसीय कीर्तनमहोत्सव आयोजित करून सामाजिक, धार्मिक कार्यक्रम पार पडले. कीर्तन महोत्सवात गोपालकाल्याचे कीर्तन सांगताना सत्य, सदाचार आणि भक्ती हे परमेश्वर उपासनेचे मार्ग आहे. प्रार्थनेमुळे आध्यात्मिक प्रगती होते. परमेश्वराची एकाग्र चित्ताने प्रार्थना किंवा मनन केल्यास अंत:करण शुद्ध होवून निश्चित सामर्थ होते, असे माणिक रोकडे महाराज यांनी सांगितले.
मागील अठरा वर्षापासून श्री गुरुदेव दत्त संप्रदाय मंडळ जैतापूर येथील नागरिक दररोज सायंकाळी अखंड हरीनामाचा जप करीत आहे. ऊन्ह, पाऊस, वारा याचा विचार न करता सायंकाळी एकत्र येऊन हरीनामाचे स्मरण करून गावात शांती व प्रसन्न वातावरण निर्मीती करीत असते. वर्षभर सुरू असलेल्या हरीनामाची वर्षपुर्ती दरवर्षी कार्तिकी एकादशीला येथील नागरिकांनी उपदेश घेतलेले गुरु प. पुज्य सद्गुरु नामदेव रोकडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य दोन दिवसीय कीर्तन, प्रवचन, भारुड, गुणवंतांचा सत्कार, गोंधळाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम मंडळी करीत आहे.
आधुनिक युगाच्या काळात समाजातील अनेकजण व्यसनाधिनतेकडे जात असताना मात्र जैतापूर येथील दत्त संप्रदायाची मंडळी मात्र व्यसनाधिनता हाणून पाडण्याचे काम करीत आहे. दोन दिवसीय कीर्तन महोत्सवाकरीता ह.भ.प. माणिक रोकडे महाराज, दत्ता मसे महाराज कढोली, तुम्बडे महाराज वाकडी (तेलंगाना), गोहोकार महाराज आवाळपूर, बोरकुटे महाराज विरूर (स्टे.), सुभाष मसे महाराज गडचांदूर यांनी आपले कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून जनतेचे समाजप्रबोधन केले. दुसऱ्या दिवशी सद्गुरु नामदेव महाराज रोकडे यांच्या प्रतिमेची दिंडी सोहळा गावात लहान थोरांच्या सहभागाने हरीनामाच्या जयघोषात बाहेरगावावरुन आलेल्या दिंडीसह पार पडला. त्यानंतर गोपालकाल्याचे कीर्तन माणिक रोकडे महाराज यांनी केले. कार्यक्रमात गावातील आठ वर्षाचा बाल गायक सौरभ मडावी व पवन हनुमंते यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. (वार्ताहर)