ट्रकची मेटॅडोअरला, मेटॅडोअरची दुसऱ्या मेटॅडोअरला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST2021-03-18T04:28:16+5:302021-03-18T04:28:16+5:30

फोटो घुग्घुस : घुग्घुसकडून चंद्रपूरकडे भरधाव जाणाऱ्या अज्ञात ट्रकने मिनी मालवाहू मेटॅडोअरला मागून धडक दिली. दरम्यान, समोरून येणाऱ्या ...

The truck hits the matador, the matador hits another matador | ट्रकची मेटॅडोअरला, मेटॅडोअरची दुसऱ्या मेटॅडोअरला धडक

ट्रकची मेटॅडोअरला, मेटॅडोअरची दुसऱ्या मेटॅडोअरला धडक

फोटो

घुग्घुस : घुग्घुसकडून चंद्रपूरकडे भरधाव जाणाऱ्या अज्ञात ट्रकने मिनी मालवाहू मेटॅडोअरला मागून धडक दिली. दरम्यान, समोरून येणाऱ्या मेटॅडोअरला या मेटॅडोअरने धडक दिली. यात दोन्ही मेटॅडोअर पलटी झाले. चालक जखमी झाला. सदर अपघात बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास नागाळा गावासमोर घडला.

ट्रकचालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून पसार झाला.

घुग्घुसकडून नागाळाकडे गुरांचा चारा घेऊन मिनी मेटॅडोअर (क्र. एमएच ३४ बीजी ५०८०) वळण घेत असताना मागून भरधाव येणाऱ्या अज्ञात ट्रकने जबर धडक दिली. त्यादरम्यान चंद्रपूरकडून घुग्घुसकडे येत असलेल्या दुसऱ्या मेटॅडोअरला (क्र. एमएच ३४ बिजी ८१८४) तो मेटॅडोअर आदळला आणि दोन्ही मेटॅडोअर रस्त्यावर उलटले. यात एका मेटॅडोअरचा चालक जखमी झाला. त्याचे नाव कळू शकले नाही. पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.

Web Title: The truck hits the matador, the matador hits another matador

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.