ट्रकची दुचाकीला धडक, एक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:30 IST2021-08-23T04:30:41+5:302021-08-23T04:30:41+5:30

देवाडा :राजुरा तालुक्यातील तेलंगणा महाराष्ट्र महामार्गावर सोंडो गावाच्या काही अंतरावर असलेल्या पुलाच्या वळणावर ट्रकची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकीस्वाराचा ...

The truck hit the two-wheeler, killing one on the spot | ट्रकची दुचाकीला धडक, एक जागीच ठार

ट्रकची दुचाकीला धडक, एक जागीच ठार

देवाडा :राजुरा तालुक्यातील तेलंगणा महाराष्ट्र महामार्गावर सोंडो गावाच्या काही अंतरावर असलेल्या पुलाच्या वळणावर ट्रकची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

टीएस २२ टी ४८९६ या क्रमांकाचा ट्रक राजुरावरून तेलंगणाकडे जात असताना ट्रकची दुचाकीला जबर धडक बसली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मुकेश सुधाकर ढोबे (३३) रा. वरूर रोड असे मृतकाचे नाव आहे. तो देवाडा येथे बाजार करून आपल्या स्वगावी जात होता. घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर एकच गर्दी उसळली. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही माहिती विरुर पोलिसांना कळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह तत्काळ शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहे.

Web Title: The truck hit the two-wheeler, killing one on the spot