शेतातील आगीच्या विळख्यात सापडला रस्त्यावरील ट्रक

By Admin | Updated: April 10, 2016 00:53 IST2016-04-10T00:53:28+5:302016-04-10T00:53:28+5:30

शेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिमूर तालुक्यातील सावरी गावालगत शनिवारी एका गोठ्याला आग लागली.

Truck found in the farm firefighters | शेतातील आगीच्या विळख्यात सापडला रस्त्यावरील ट्रक

शेतातील आगीच्या विळख्यात सापडला रस्त्यावरील ट्रक

सावरी येथील घटना: दोन बैल आगीत होरपळले
वरोरा: शेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिमूर तालुक्यातील सावरी गावालगत शनिवारी एका गोठ्याला आग लागली. याचदरम्यान, आगीजवळून जाणाऱ्या एका ट्रकनेही पेट घेतला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. या आगीत गोठ्यात दोन बैल होरपळून गंभीर जखमी झाले.
सावरी-खाणगाव मार्गावरील तुळशीदास आवारी यांच्या शेतीतील गोठ्याला शनिवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत आवारी यांच्या शेतातील पाण्याचे पाईप, गुरांचा चारा जळून खाक झाला. दरम्यान, ही आग सर्वत्र पसरली. या आगीत लगतच्या शेतातील किसन उमरे यांच्या शेतातील दोन बैल होरपळून जखमी झाले. आगीचे तांडव सुरू असतानाच शेताजवळून तणीस घेऊन एक ट्रक जात असताना या ट्रकनेही पेट घेतला. सायंकाळी उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. मात्र आग आटोक्यात आली नव्हती. आग विझविण्यासाठी वरोरा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Truck found in the farm firefighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.