धावता ट्रक शिरना नदीत कोसळला

By Admin | Updated: June 27, 2014 00:33 IST2014-06-27T00:33:02+5:302014-06-27T00:33:02+5:30

चारगाव खाणी जवळील शिरना नदीच्या पुलावरून ट्रक नदीत कोसळून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. तर दुसरा बेपत्ता आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. प्रविण शंकर शिडाम(३०)

The truck collapsed in the Sharina river | धावता ट्रक शिरना नदीत कोसळला

धावता ट्रक शिरना नदीत कोसळला

एकाचा मृत्यू, दुसऱ्याचा शोध सुरु
माजरी (चंद्रपूर) : चारगाव खाणी जवळील शिरना नदीच्या पुलावरून ट्रक नदीत कोसळून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. तर दुसरा बेपत्ता आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. प्रविण शंकर शिडाम(३०) असे मृत चालकाचे नाव आहे.
माजरी खदान येथील अब्दूल सेठ यांच्या मालकीचा रिकामा ट्रक क्रमांक सीजी ०४-८३९५ येथील चौकी नं. १ येथून ढोरवासा कोळसा खाणीकडे जात होता. दरम्यान चारगाव खाणी जवळील शिरना नदीच्या पुलाचे कठडे तोडून ट्रक नदीत कोसळला. ट्रक चालक प्रवीण शंकर सिडाम(३०) रा. नागलोन याचा मृतदेह चार वाजताच्या दरम्यान सापडला. या ट्रकमध्ये वाहन किंवा अन्य प्रवाशी होते का, याचा शोध पोलीस तथा पथक घेत आहे. वेकोलिच्या क्रेनच्या सहाय्याने शोध सुरु असून वृत्त लिहेपर्यंत पथक शोध घेत आहेत. माजरी तसेच भद्रावती पोलीस घटनेचा तपास करीत आहे. या ट्रकमध्ये संतोष पेंदाम नामक युवक ट्रकमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. (वार्ताहर)

Web Title: The truck collapsed in the Sharina river