मुंगोली पुलावरून ट्रक कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 23:31 IST2018-07-13T23:31:38+5:302018-07-13T23:31:57+5:30
कोळसा वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकचालकाचे वाहनावरीलनियंत्रण सुटल्याने वर्धा नदीच्या मुंगोली पुलावरून ट्रक नदीत कोसळला. यात सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी ट्रकचालक जखमी झाला आहे. यात ट्रकमालकाचेही मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

मुंगोली पुलावरून ट्रक कोसळला
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : कोळसा वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकचालकाचे वाहनावरीलनियंत्रण सुटल्याने वर्धा नदीच्या मुंगोली पुलावरून ट्रक नदीत कोसळला. यात सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी ट्रकचालक जखमी झाला आहे. यात ट्रकमालकाचेही मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
सदर ट्रक (क्रमांक एमएच ३४ एबी २४४८) शुक्रवारी सकाळी घुग्घूस रेल्वे सायडींग येथे कोळसा खाली करुन परत पैनगंगा कोळसा खाणीकडे कोळसा आणण्यासाठी जात होता. दरम्यान, ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हायवा ट्रक वर्धा नदीच्या मुंगोली पुलावरून नदीत कोसळला.
यात चालक जखमी झाला. त्याला वेकोलिच्या राजीव रतन दवाखान्यात औषधोपचार करून पुढील औषधोपचाराकरिता चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे.