रेती घेऊन जाणारा ट्रक उलटला

By Admin | Updated: March 2, 2016 00:23 IST2016-03-02T00:23:26+5:302016-03-02T00:23:26+5:30

राजुराकडून साखरी येथे रेती घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला.

The truck carrying the sand rolled up | रेती घेऊन जाणारा ट्रक उलटला

रेती घेऊन जाणारा ट्रक उलटला

गोवरी येथील घटना : सुदैवाने जीवित हानी टळली
गोवरी : राजुराकडून साखरी येथे रेती घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. हा अपघात मंगळावारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास गोवरी गावाजवळील नाल्याच्या पुलावर घडला.
राजुरा-गोवरी-कवठाळा या वेकोलि परिसरातून जाणाऱ्या मार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. राजुरा येथून साखरी येथे रेती घेऊन जाणाऱ्या ट्रक (एम.एच.३४ ए-५१००) च्या चालकाचे गोवरी गावाजवळ वाहनावरील नियंत्रण सुटले. यात ट्रक पूर्णपणे रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाल्याने त्याला राजुरा येथील एका खासगी दवाखान्यात उपचारार्थ हलविण्यात आले. राजुरा-गोवरी मार्गावर दिवसेंदिवस रहदारीचे प्रमाण वाढत चालले असून १५ दिवसांपूर्वी कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात होऊन तो रस्त्याच्या कडेला उलटला होता. राजुरा-पोवनी-साखरी मार्गावर तीन लहान पूल आहेत. या पुलावरच नेमका वळणरस्ता असल्याने अनेकदा पुलावर अपघात घडले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पुलावर पक्के कठडे नसल्याने येथे वारंवार अपघात घडत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The truck carrying the sand rolled up