पॅसेंजर बंद असल्याने रेल्वे प्रवाशांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:25 IST2021-03-22T04:25:34+5:302021-03-22T04:25:34+5:30
चंद्रपूर तसेच बल्लारपूर रेल्वे स्थानकावर बहुतांश रेल्वे थांबतात. मात्र, आता काही विशेष गाड्यांशिवाय अन्य रेल्वे धावतच नसल्याने रेल्वे स्थानकावरही ...

पॅसेंजर बंद असल्याने रेल्वे प्रवाशांना त्रास
चंद्रपूर तसेच बल्लारपूर रेल्वे स्थानकावर बहुतांश रेल्वे थांबतात. मात्र, आता काही विशेष गाड्यांशिवाय अन्य रेल्वे धावतच नसल्याने रेल्वे स्थानकावरही आता शुकशुकाट बघायला मिळत आहे. विशेषत: बल्लारपूर येथून बल्लारशा-गोंदिया, बल्लारशहा वर्धा या पॅसेंजर धावतात. मात्र, लाॅकडाऊनपासून या रेल्वेगाड्या बंद आहे. परिणामी अनेकांचा रोजगारही बुडाला आहे. पॅसेंजर बंद असल्याने या मार्गावरून प्रवास करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचे नुकसान होत आहे. या मार्गाने प्रवास करणारे प्रवासी आता रेल्वे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, रुग्णसंख्या वाढत असल्याने सध्यातरी पॅसेंजर सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. मागील मार्च महिन्यापासून बल्लारपूर-गोंदिया तसेच बल्लारपूर-वर्धा ही पॅसेंजर बंद आहे. परिणामी या मागार्वरील दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे. बसने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसत आहे.